गोदामात साठवलेला ८४ लाख रुपयांचा अवैध गुटखा, तंबाखूजन्य पदार्थाचा साठा जप्त – अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

भिवंडी : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन घोषित करण्या आधीपासूनच कोरोनाचा प्रसार ज्या गोष्टींमधून होऊ शकतो अशा तंबाखू सिगरेट व अनधिकृतपणे गुटखा विक्री करणाऱ्या पानपट्टी

 भिवंडी :  कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन घोषित करण्या आधीपासूनच कोरोनाचा प्रसार ज्या गोष्टींमधून होऊ शकतो अशा तंबाखू सिगरेट व अनधिकृतपणे गुटखा विक्री करणाऱ्या पानपट्टी व्यावसायिकांवर बंदी आणली. मात्र असे असतानाही काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गुटखा विक्री होत असल्याच्या तक्रारी येत असल्याने अन्न व औषध प्रशासन दक्षता विभागाचे सह आयुक्त सुनील भारद्वाज यांना भिवंडी तालुक्यातील व ग्रामपंचायत हद्दीमधील प्रेरणा कॉम्प्लेक्स या गोदाम संकुलातील एका गोदामात मोठ्या प्रमाणावर तंबाखू व गुटखा अवैधरित्या साठविल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांच्या नेतृत्वाखालील सहाय्यक आयुक्त भूषण मोरे, अन्नसुरक्षा अधिकारी अरुण खडके ,माणिक जाधव, शंकर राठोड, अरविंद कांडेलकर, एम एम सानप, संतोष सुरसिया या पथकाने या गोदामावर धाड मारून विमल , शुद्ध प्लस, गुलाम, तुलसी जर्दा, तैमुर अशा विविध नावांनी विकल्या जाणाऱ्या गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांचा ८४ लाख रुपयांचा साठा जप्त करण्याची कारवाई केली आहे.  सदरचा माल साठवण करणाऱ्या विरोधात अन्नसुरक्षा मानके कायदा २००६ भारतीय दंड संहिता कायद्या नुसार नारपोली पोलीस स्टेशन याठिकाणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुर केली असून त्यानंतर या मुद्देमालाची कायदेशीर विल्हेवाट लावण्यात येणार  असल्याची माहिती अन्न औषध प्रशासनाच्या दक्षता विभागाचे सहआयुक्त सुनील भारद्वाज यांनी दिले आहे.