हुकूमशाही वृत्तीच्या महाविकास आघाडीला राज्यात अराजक आणावयाची आहे का? विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांचा प्रश्न

    मुंबई (Mumbai) : महाविकास आघाडीचा एक ज्येष्ठ मंत्री(A senior minister of the Mahavikas Aghadi) केंद्रीय तपास यंत्रणांविरुद्ध उठाव करण्याची चिथावणी देतो (threaten) तर दुसरा मंत्री एनसीबीच्या अधिकाऱ्याची (NCB official) नोकरी घालवण्याची धमकी देतो. राज्यात अराजक निर्माण व्हावे (to create chaos) हीच महाविकास आघाडीच्या हुकूमशाही प्रवृत्तीच्या नेत्यांची (the dictatorial leaders of the Mahavikas Aghadi) इच्छा असल्याचे यावरून दिसते, असा आरोप विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते (Leader of Opposition) प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी केला आहे.

    नुकतेच अल्पसंख्य विकास खात्याचे मंत्री नबाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांना तुरुंगात टाकू, अशी धमकी दिली होती. तर भाजपशी संगनमत करणाऱ्या ईडी विरुद्ध उठाव करावा लागेल, असे विधान अन्न व नागरी पुरवठा खात्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे. त्यावरून दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर तोफ डागली आहे. जनतेचे शोषण करणारे हे नेते आता तपास यंत्रणांनाही धमक्या देत असून हे दुर्दैवी आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

    देशावर आणीबाणी लादून लोकशाहीची हत्या करणाऱ्यांचे वैचारिक वारस सध्या राज्यात सत्तेवर असून त्यांच्या मनात लपलेला हुकूमशहा अशा प्रकारे बाहेर डोकावू लागला आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या भ्रष्ट कारभारावर केंद्र सरकार लगाम लावत असल्याने त्या नेत्यांचा राग अशा प्रकारे उफाळून आला आहे. आपल्यावरील सर्व कायद्याचे निर्बंध झुगारून मनमानी भ्रष्ट कारभार करावा ही महाविकास आघाडीच्या नेत्यांची इच्छा आहे. मात्र ती इच्छा केंद्र सरकार केव्हाही पूर्ण होऊ देणार नाही, असा इशाराही दरेकर यांनी दिला.

    पूर्वी औरंगजेबाच्या सैनिकांच्या घोड्यांना पाण्यातही संताजी-धनाजी दिसायचे असे म्हटले जात होते. तसे महाविकास आघाडीच्या भ्रष्ट नेत्यांना आता झोपेत केंद्रीय तपास यंत्रणांची आणि तुरुंगवासाची स्वप्ने पडून त्यांची झोप उडू लागली आहे. त्याच वैफल्यापोटी अर्धेच काय पण पूर्ण मंत्रीमंडळ तुरुंगात टाका, अशी विधाने ते करू लागले आहेत. सुईच्या टोकावर मावेल एवढीही जमीन पांडवांना देणार नाही, मग भले कुरुकुलाचा नाश झाला तरी चालेल, अशी दर्पोक्ती दुर्योधनाने महाभारतात केली होती. त्यावर भगवान श्रीकृष्णांनी तथास्तू असे उद्गार काढले व नंतर तसेच घडले होते, याची आठवणही दरेकर यांनी यासंदर्भात करून दिली आहे.

    जामातो दशमो ग्रह, म्हणजे जावई हा सासऱ्याच्या राशीला लागलेला दहावा ग्रह असतो हे देखील महाविकास आघाडीतील मंत्र्यांनी ध्यानात ठेवावे. यापूर्वीही देशात महाविकास आघाडीच्या सर्वोच्च नेत्यांसह अनेक नेत्यांना त्यांच्या जावयांनीच अडचणीत आणले आहे. राज्यातील जावई देखील मंत्र्यांना गोत्यात आणण्यास समर्थ आहेत. त्यामुळे अशा जावयांसाठी आघाडी सरकारमधील नेत्यांनी प्रामाणिक अधिकाऱ्यांवर आरोप करू नयेत. राज्यघटनेनुसार सर्व नागरिकांना समान व न्याय्य वागणूक देण्याबाबत घेतलेल्या शपथेची आठवणही मंत्र्यांनी ठेवावी, असाही टोला दरेकर यांनी लगावला आहे.