नागपुरात सोमवारी केवळ १ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची नोंद; अॅक्टिव्ह रुग्णसंख्येत मोठी घसरण

    नागपूर (Nagpur) : नागपूर महानगर पालिकेच्या (Nagpur Municipal Corporation) आरोग्य विभागाकडून (the health department) राबवविण्यात येत असलेल्या कोरोना व्हॅक्सिनेशन (The corona vaccination) आणि प्रभावी उपचार पद्धतीचा सकारात्मक परिणाम दिसू लागला आहे. यामुळे शहरात सोमवारी अत्यंत कमी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची (corona-positive patients) नोंद करण्यात आली.

    प्राप्त अहवालानुसार शहरात सोमवारी केवळ ०१ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला. कोरोनामुक्त (corona-free) झालेल्या रुग्णांची संख्या ०४ आहे.

    नागपूर शहरात एकूण कोरोना अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या खालावून १३ वर आली आहे. आज शहरात कोरोनामुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झाल्याची नोंद नाही. मनपाच्या आरोग्य विभागाकडून सोमवारी १७५५ नागरिकांनी कोरोना टेस्टिंग करवून घेतली. यापैकी १७५४ नागरिकांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाला. कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी कोरोना व्हॅक्सिनेशन हा सर्वांत प्रभावी उपाय आहे. या पार्श्वभूमीवर शहरात सोमवारी १५ लाख २२ हजार ८५४ नागरिकांना कोरोनाची पहिली लस देण्यात आली. यासह ०८ लाख ३ हजार ११८ नागरिकांनी कोरोनाची दुसऱ्या क्रमांकाची लस टोचून घेतली.

    शहरात सोमवारी प्राप्त झालेला कोरोना लसिकरणाचा एकूण आकडा २३ लाख २५ हजार ९७२ आहे. कोरोनाची तिसरी लाट रोखणे ही आपली सार्वजनिक जबाबदारी आहे. नागरिकांनी याकरिता कोरोना लसीचे दोन्ही डोज अवश्य घ्यावे आणि कोरोना प्रतिबंधक नियमावलीचे पालन करावे, असे आवाहन ‘नवराष्ट्र न्यूज नेटवर्क’तर्फे करण्यात येत आहे.