” देव देईल विसावा “

समस्त मनुष्य जातीचा बारकाईनं विचार केला असता एक गोष्ट प्रकर्षानं जाणवते ती म्हणजे प्रत्येक मानवाला असलेली सुखाची ,शांतीची अर्थात विसाव्याची मूलभूत अपेक्षा.सुख प्राप्ती साठी अहर्निशी धावाधाव करताना सगळे दिसतात परंतु ती धावाधाव दुःखाला जन्माला घालते.

 समस्त मनुष्य जातीचा बारकाईनं विचार केला असता एक गोष्ट प्रकर्षानं जाणवते ती म्हणजे प्रत्येक मानवाला असलेली सुखाची ,शांतीची अर्थात विसाव्याची मूलभूत अपेक्षा.सुख प्राप्ती साठी अहर्निशी धावाधाव करताना सगळे दिसतात परंतु ती धावाधाव दुःखाला जन्माला घालते. #जीव_विसावयाचिया_चाडा । #सैंघ_धावाधाव_करीतसे_बापुडा ।। माऊली सांगतात जीव धावपळ खूप करतो पण त्याला खरी विश्रांती कुठेही मिळत नाही.संत महात्मे सुखाचं शाश्वत स्थान आपल्याला सांगून देतात.तुम्हाला सुख अपेक्षित असेल तर पंढरीला जा तिथे तुम्हाला निश्चित सुख मिळेल.

सुखालागीं_करिसी_तळमळ । तरी तू पंढरीसी जाय एक वेळ ।। मग तू अवघाची सुखरूप होसी,,
पंढरीमध्ये स्थित असणारा देव सुखस्वरूप आहे आणि तो आपल्या भक्तांना देखील सगळी सुखं बहाल करतो.
जीवाला अपेक्षित असणारा नित्य असा विसावा तिथे प्राप्त होतो कारण तो परमात्मा सर्व जीवांना विश्रांती देणारा असा आहे.#जो_सकळ_जीवांचा_विसावा । नैष्कर्म्य सुखाचा ठेवा .
  साधनेत प्रतिबंध करणारा अभिमान पंढरीत निवृत्त होतो.लहान-मोठा,पवित्र-अपवित्र,जात-वर्ण असं कोणतहीं द्वंद्व तिथे शिल्लक रहात नाही.
उठाउठी अभिमान । जाय ऐसे स्थळ कोण ।।
ते या पंढरीस घडे । खळा पाझर रोकडे ।।
सर्व वारकरी वैष्णव एकमेकाच्या पाया लागतात हे अभिमान निवृत्तीचं द्योतक आहे.एकदा अभिमान निवृत्ती झाली की जीव खऱ्या आनंदाला प्राप्त होतो.ज्याप्रमाणे रोग बरा झाला की अन्नाची गोडी छान चाखायला मिळते त्याप्रमाणे अभिमानादिक विकार निघून गेले की जीवन परिपूर्ण होत आणि जीवाला शाश्वत असा विसावा प्राप्त होतो.
वारी हि सांप्रदायाची अंतरंग अशी हार्दिक साधना आहे .संतांच्या पाऊलांचा मागोवा घेत जीवाला अखंड सुखाची प्राप्ती होते.
आमुची विश्रांती । तुमचे चरण कमळापती ।।
हेचि एक जाणे । काया वाचा आणि मने ।।
शब्दांकन: ह. भ. प. ज्ञानेश्वर माऊली काकडे