९ तासात ४७ एमएम पाऊस

-पावसाला लागणार ब्रेक ; ११ तारखेपासून पाऊस मुंबई: चक्रीवादळाचा धोका मुंबईत आता टळला आहे. पण बुधवारी ज़ालेल्या पाऊसाचा चांगलाच फ़टका दक्षिण मुंबईला बसला आहे. केवळ ९ तासात दक्षिण मुंबई शहर

-पावसाला  लागणार ब्रेक ; ११  तारखेपासून पाऊस

मुंबई: चक्रीवादळाचा धोका मुंबईत आता टळला आहे. पण बुधवारी ज़ालेल्या पाऊसाचा चांगलाच फ़टका दक्षिण मुंबईला बसला आहे. केवळ ९ तासात दक्षिण मुंबई शहर मधे ४७ एमएम (मिलीलीटर) पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर, दादर, वडाला, करीरोड आदि काही ठिकाणी झडे  कोसळण्याच्याही घटना घडल्या. गुरुवार पर्यंत पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. बुधवारी सकाळी ८.३० ते संध्याकाळी ५.३० पर्यंत शहर व उपनगरात पावसाच्या चागल्याच सरी कोसळल्या. शहरात ४७ एमएम व उपनगरात २३ एमएम पावसाची नोंद करण्यात आली आहे. तसेच शहर ३१ डिग्री व उपनगर ३४ डिग्री  सेल्सियस तापमान नोंदविण्यात आले. तर गुरुवारपर्यंत पाऊस बंद हौइल,तसेच येत्या ११  जून नंतर पुन्हा पाऊस सुरु होईल,  असे हवामान खात्याकडून सांगण्यात आले.