माजी खासदार आढळराव व विद्यमान खासदार डॉ. कोल्हे यांच्यात जुंपली

पुणे : पुणे - नाशिक रेल्वे प्रकल्पाचे श्रेय घेण्यावरून महाविकास अाघाडीच्या एका माजी खासदार अािण िवद्यमान खासदार यांच्यांत अाराेप प्रत्याराेप सुरू झाले अाहे.

 पुणे – नाशिक रेल्वे प्रकल्पाचा श्रेयवाद

 
पुणे : पुणे – नाशिक रेल्वे प्रकल्पाचे श्रेय घेण्यावरून महाविकास अाघाडीच्या एका माजी खासदार अािण िवद्यमान खासदार यांच्यांत अाराेप प्रत्याराेप सुरू झाले अाहे. माजी खासदार िशवाजीराव अाढळराव- पाटील यांनी अापण पंधरा वर्ष याकरीता पाठपुरावा करीत असल्याचा दावा केला तर, वर्षभराच्या अात याप्रकल्पाला अापण मंजुरी मिळवून िदली असा दावा राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार डाॅ. अमाेल काेल्हे यांनी केला अाहे.
खेड लाेकसभा मतदार संघाच्या िवकासाच्या दृष्टीने हा रेल्वेमार्ग महत्वाचा अाहे. जुन्नर, खेड, अांबेगाव या ग्रामीण भागाबराेबरच िपंपरी िचंचवड महापािलकेच्या हद्दीतील भाेसरी अादी अाैद्याेगिक पट्ट्याच्या दृष्टीने हा रेल्वे मार्ग िदशा देणारा ठरू शकताे. पुणे ते नािशक रेल्वे मार्ग प्रकल्पाचा िवषय अनेक वर्षापासून चर्चेत अाहे. नुकतेच केंद्र सरकारने  या प्रकल्पाला मंजुरी िदली अाहे. याबाबत िशरुर लाेकसभा मतदार संघाचे िवद्यमान खासदार अािण राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते डाॅ. काेल्हे यांनी अापण या प्रकल्पासाठी पाठपुरावा केला अािण वर्षभराच्या अात त्यास मंजुरी मिळवून िदल्याचा दावा केला हाेता.
यावर माजी खासदार अाढळराव – पाटील यांनी गेल्या पंधरा वर्षांत केंद्र सरकारकडे केलेल्या पाठपुराव्याची माहीती साेशल मिडीयावरून समाेर अाणली. यामार्गासाठी २०१६ च्या अंदाजपत्रकात मंजुरी िदली गेली हाेती, त्यासाठी तीन हजाराहून अधिक काेटी रुपये निधी मंजुर झाला हाेता. केवळ एकावर्षाच्या कालावधीत पाठपुरावा करून हा प्रकल्प मंजुर हाेणारा नाही अशी िटका अाढळराव – पाटील यांनी केली हाेती. तसेच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे अािण केंद्रीय रेल्वे मंत्री यांच्याशी अापण सातत्याने याविषयासाठी पाठपुरावा करीत हाेताे असेही अाढळराव – पाटील यांनी नमूद केले अाहे. याला विद्यमान खासदार काेल्हे यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला अाहे. श्रेय घेण्यासाठी नसत्या उठाठेवी काेणी करू नये असा टाेमणाही त्यांनी लगावला अाहे.