अरुण मेहता यांना आदरांजली अर्पण

पेण : माजी विधान परिषद सदस्य, शरद पवार यांचे अनुयायी अरुण मेहता यांची आज जयंती. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी टिळक भवनच्या बाजूला त्यांच्या कार्यालयामध्ये त्यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी

पेण : माजी विधान परिषद सदस्य, शरद पवार यांचे अनुयायी अरुण मेहता यांची आज जयंती. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी टिळक भवनच्या बाजूला त्यांच्या कार्यालयामध्ये त्यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी स्थानिक आमदार कालिदास कोळंबकर यांच्या शुभ हस्ते अरुण मेहता यांनी प्रतिमेस पुष्पहार घालून विनम्र अभिवादन केले.

अरुण मेहता यांनी भारतीय कामगार सेनेच्या स्थापनेपासून सरचिटणीस म्हणून काम केले होते. बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेच्या स्थापनेपासून त्यांनी काम केले होत. एक उत्कृष्ठ वक्ते व अभ्यासू नेते म्हणून ते प्रसिद्ध होते. कोणत्याही विषयावर अभ्यासपूर्ण बोलणारे, विधान परिषद गाजवणारे असे वक्तृत्वावर जबरदस्त पकड असेलेले अरुण मेहता आजही अनेकांचा आदर्श आहेत. त्यांना त्यांच्या कार्यकर्त्यांनी भावपूर्ण आदरांजली वाहिली. यावेळी आदरांजली वाहण्यासाठी 

सिद्धीविनायक मंदिरचे मा. ट्रस्टी एकनाथ संगम , बबन राणे, प्रकाश तरळ, जितू कांबळे, बाळू पाटील, राजा राणे, तन्मय सकपाळ, आनंद संगम ,दीपक ढवण, अमोल मोहीते, रवींद्र बामणे व इतर मंडळी उपस्थित होती.