By नवराष्ट्र | Updated Date: Aug 14 2019 2:54PM |
2
मुंबई : बालभारतीच्या ३० हून अधिक कवितांचे विद्यार्थ्यांसमोर नाट्य, गायन, वाचन, नृत्य स्वरुपात सादरीकरण झाले तर त्यांना दप्तराचे ओझे वाटणारी पुस्तके हलकी वाटू लागतील आणि या नव्या मित्रांशी विद्यार्थ्यांची मैत्री जमेल. या उद्देशाने बालरंगभूमीवर काम करणाऱ्या गंधार या संस्थेने बालभारतीच्या पहिली ते दहावीच्या पुस्तकातील कवितांचा बच्चेकंपनीसाठी रंगमंचिय आविष्कार रंगभूमीवर आणला आहे.
या कार्यक्रमातून येणारा निधी हा मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दिला जाणार आहे. या कार्यक्रमाचा पहिला प्रयोग १७ ऑगस्ट रोजी सकाळी ११.०० वा. दादर येथील शिवाजी मंदिर येथे शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री आशिष शेलार, आमदार संजय केळकर, अशोक हांडे, अभिनेते विजय गोखले, नाटककार प्रदीप ढवळ यांच्या उपस्थितीत होणार आहे. तर २५ ऑगस्ट रोजी सकाळी ११.०० वा. ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे महापौर मिनाक्षी शिंदे, सभागृह नेते नरेश म्हस्के यांच्या उपस्थितीत होणार आहे.