भिवंडीत सात ठिकाणी झाडे पडली

भिवंडी :निसर्ग चक्रीवादळाने आज राज्यातील समुद्र किनाऱ्यांवर थैमान घातले होते. भिवंडीत मंगळवारी रात्रीपासूनच रिमझिम पावसाने हजेरी लावली होती. बुधवारी देखील पावसाची रिमझिम दिवसभर सुरूच होती.

 भिवंडी :निसर्ग चक्रीवादळाने आज राज्यातील समुद्र किनाऱ्यांवर थैमान घातले होते. भिवंडीत मंगळवारी रात्रीपासूनच रिमझिम पावसाने हजेरी लावली होती. बुधवारी देखील पावसाची रिमझिम दिवसभर सुरूच होती. दरम्यान शहरातील कल्याणरोड येथील मार्कंडेश्वर मंदिर परिसर ,नारपोली येथे मोतीबाई तलाव, सालाउद्दीन हायस्कुल , सोहम हॉस्पिटल परिसर , तसेच निशान हॉटेलसमोर तसेच शाह आदाम रोडवरील पीर बाबा दर्गा तसेच दिवान शहा दर्गा अशा सात ठिकाणी झाडे पडल्याच्या घटना घडल्या आहेत. काही ठिकाणी झाडे थेट नागरी वस्त्यांमध्ये घरांवर पडल्यामुळे नागरिकांच्या घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मनपा प्रशासनाच्या आपत्कालीन विभाग व अग्निशमन दलाच्या साहाय्याने पडलेली झाडे बाजूला काढण्याचे काम सुरु आहे. मात्र सुदैवाने कोणतीही जिवीत हानी झाली नसल्याची नसल्याची माहिती मनपा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. तर ग्रामीण भागात देखील सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली होती.