चुनरीवाली माताजी यांचे निधन

अहमदाबाद: सत्तर वर्षांपेक्षा अधिक काळ अन्न- पाणी ग्रहण केल्याशिवाय जिवंत असण्याचा दावा करणाऱ्या योगी प्रल्हाद जानी उर्फ चुनरीवाला माताजी यांचे आज गुजरातच्या गांधीनगर भागात निधन झाले आहे.

 अहमदाबाद: सत्तर वर्षांपेक्षा अधिक काळ अन्न- पाणी ग्रहण केल्याशिवाय जिवंत असण्याचा दावा करणाऱ्या योगी प्रल्हाद जानी उर्फ चुनरीवाला माताजी यांचे आज  गुजरातच्या गांधीनगर भागात निधन झाले आहे. त्यांचे वय ९० वर्षे होते. त्यांच्या शिष्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी त्यांच्या चराडा या गावी अखेरचा श्वास घेतला. गुजरातमध्ये त्यांचे खुप अनुयायी आहेत. देवीने त्यांना जिवंत ठेवले आहे त्यामुळे त्यांना अन्न आणि पाणी ग्रहण करण्याची गरज पडत नसल्याचा दावा ते करायचे.त्यांनी काही काळ आपल्या मुळ गावी राहण्याची ईच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे त्यांना काही दिवसांपुर्वी चराडा येथे आणण्यात आल्याचे समजते. आज त्यांचा मृत्यू झाला. काही दिवस त्यांचे पार्थिव आश्रमात दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. बुधवारी त्यांच्या आश्रमात त्यांची समाधी बांधण्यात येणार असल्याचे समजते.

अंबेमातेवर त्यांचा खूप विश्वास होता त्यामुळे ते नेहमी चुनरी बांधूून महिलेप्रमाणे राहायचे. त्यामुळे त्यांचे नाव चुनरीवाला माताजी असे पडले होते.