घाटकोपर मेट्रो स्टेशनच्या नावातून विवो या चिनी कंपनीचे नाव हटवण्याची मागणी

घाटकोपर : कोरोना विषाणूचा प्रादूर्भावाला कारणीभूत ठरलेल्या चिनी देशाने भारता विरुद्ध छुप्या कुरापती सुरूच ठेवल्या असून लदाख भागात चिनी सैनिकांनी भारतीय सैनिकांवर हल्ले सुरू केल्याने नागरिकांनी संताप

घाटकोपर : कोरोना विषाणूचा प्रादूर्भावाला कारणीभूत ठरलेल्या चिनी देशाने भारता विरुद्ध छुप्या कुरापती सुरूच ठेवल्या असून लदाख भागात चिनी सैनिकांनी भारतीय सैनिकांवर हल्ले सुरू केल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. भारतात चीन मोठ्या प्रमाणात उत्पादन घेत असताना भारता विरुद्ध कटू राजकारण करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वोकल फॉर लोकलचा नारा दिल्यानंतर देशात स्वदेशी माल खरेदी करण्यावर नियोजन आखले जात आहे. देशाला आत्मनिर्भर केले जात असताना चिनी वस्तूंवरदेखील बहिष्कार घालण्याची मागणी होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर भाजपा युवा मोर्चाचे राष्ट्रीय सदस्य शुभ्रंशु दीक्षित यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून घाटकोपर मेट्रो स्थानकातील विवो घाटकोपर हे चिनी कंपनीचे नाव ठेवले असून ते नाव हटवण्याची मागणी करण्यात आली आहे. या नावाला मनसेनेदेखील विरोध दर्शविला आहे.