‘या’ कारणामुळे कोका-कोला कंपनीने जाहिरात थांबवण्याचे दिले आदेश

एफएमसीजी कंपन्यांपैकी एक असलेल्या कोका-कोलाने जाहिरात थांबवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर पुढील तीस दिवसांसाठी त्यांच्या कंपनीचे सर्व जाहिरातींचे पेमेंट थांबवण्यास सांगतिले आहे.

एफएमसीजी कंपन्यांपैकी एक असलेल्या कोका-कोलाने जाहिरात थांबवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर पुढील तीस दिवसांसाठी त्यांच्या कंपनीचे सर्व जाहिरातींचे पेमेंट थांबवण्यास सांगतिले आहे. मिळालेल्या माहितीनुसार,गेल्या काही दिवसांमध्ये सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वर्णद्वेषी जाहिरातींना विरोध केला जात आहे. म्हणूनच कंपन्या त्यांच्या जाहिरातींना थांबवत आहेत आणि त्यांच्या ब्रँडचे नाव बदलण्यासही प्रवृत्त झाल्या आहेत.  त्यामुळे कंपनीला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वर्णद्वेषी सामग्रीचा कसा सामना करावा यावर काम करायचे आहे. 

जगात वर्णद्वेषाला कोणतेही स्थान नाही तसेच सोशल मीडियावरही वर्णद्वेषाला स्थान नाही. असे कोका-कोला कंपनीचे चेअरमन आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जेम्स क्विनी यांनी म्हटलं आहे. जाहिरात थांबवण्याचा अर्थ असा नाही की ते गेल्या आठवड्यात आफ्रिकन अमेरिकन नागरी गटांनी सुरू केलेल्या चळवळीत सामील होत आहे. असे बेवरेज जायंट म्हणून प्रसिद्ध असलेल्या कोका-कोलाने नुकत्याच एका मुलाखतीत सांगितले आहे.