पनवेल शहरात मेट्रोपोलीस लॅब करणार ४.५ कोटींच्या कोरोना चाचण्या मोफत

पनवेल : पनवेल शहरामध्ये पुढील ३ महिन्यात एकूण १०,००० चाचण्या सीएसआर माध्यमातून मोफत करण्यास मेट्रोपोलीस लॅबने तयारी दर्शवली आहे . आयुक्त सुधाकर देशमुख आणि मेट्रोपोलीस लॅबच्या प्रतिनिधींमध्ये आज

पनवेल : पनवेल शहरामध्ये पुढील ३ महिन्यात एकूण १०,००० चाचण्या सीएसआर माध्यमातून मोफत करण्यास मेट्रोपोलीस लॅबने तयारी दर्शवली आहे . आयुक्त सुधाकर देशमुख आणि मेट्रोपोलीस लॅबच्या प्रतिनिधींमध्ये आज झालेल्या चर्चेत याला मान्यता दिल्याने पनवेल महानगरपालिकेचे ४.५ कोटीं रुपये वाचणार आहेत.

मेट्रोपोलीस या कोरोना चाचणी करणाऱ्या आयसीएमआर मान्यताप्राप्त खाजगी प्रयोगशाळेबरोबर महापालिकेकडून पत्रव्यवहार करण्यात आला होता. त्यास या प्रयोगशाळेने अत्यंत सकारात्मक प्रतिसाद देऊन पनवेल शहरामध्ये पुढील ३ महिन्यात एकूण १०,००० चाचण्या सीएसआर माध्यमातून मोफत करण्यासाठी तयारी दर्शवली आहे. यानुसार आज संबंधित प्रयोगशाळेचे प्रतिनिधी डॉ. प्रदीप महिंद्रकर व महाजन यांच्यासोबत महानगरपालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी विचारविनिमय केला. नियोजनाची दिशा ठरविण्यात आली.या चाचणीसाठी प्रत्येकी रुपये ४,५०० का खर्च येतो. या प्रस्तावामुळे महानगरपालिकेस अंदाजे रुपये ४ कोटी ५० लाख इतक्या रकमेचा फायदा होणार आहे. महानगरपालिकेच्या निधीतून हा खर्च केला असता तर तेवढा भार महानगर पालिकेच्या तिजोरीवर पडला असता. पनवेल लवकरच कोरोनामुक्त करण्यासाठी नागरिकांनी महानगरपालिकेस नियम पाळून सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी आयुक्तांनी केले आहे.