जिल्ह्यात ८०२ जणांनी केली कोरोनावर मात, सध्याची रुग्ण संख्या ५२४

पनवेल : स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर आतापर्यंत जिल्ह्यातील ८०२ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तर आज ८२ नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद होऊन सद्य:स्थितीत जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या (Active Cases) नागरिकांची संख्या पनवेल मनपा २८०, पनवेल ग्रामीण-६५, उरण-१५, खालापूर-९, कर्जत-१४, पेण-१२, अलिबाग-३१, मुरुड-१३, माणगाव-२६, तळा-७, रोहा-५, सुधागड-१, म्हसळा-२७, महाड-१०, पोलादपूर-९ अशी एकूण ५२४ झाली आहे.

            कोविड-१९ ने बाधित झालेले मात्र आरोग्य यंत्रणेच्या यशस्वी प्रयत्नानंतर आणि स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर बऱ्या झालेल्या नागरिकांची संख्या पनवेल मनपा-३८३, पनवेल ग्रामीण १६३, उरण-१५२, खालापूर-२, कर्जत-१३, पेण-११, अलिबाग-७, माणगाव-२४, तळा-५, रोहा-१८, सुधागड-१, श्रीवर्धन-९, म्हसळा-१, महाड-२, पोलादपूर-११ अशी एकूण ८०२ आहे.          
            आज दिवसभरातही पनवेल मनपा-१९, पनवेल ग्रामीण-५, उरण-४, पेण-५, तळा-१,  रोहा-१०, सुधागड-१ असे  एकूण  ४५ नागरीक कोरोना विरोधातील लढाई जिंकून पूर्णपणे बरे होऊन आपल्या घरी गेले आहेत.
         आतापर्यंत पनवेल मनपा-३०, पनवेल ग्रामीण-९, उरण-१, खालापूर-१, कर्जत-३, अलिबाग-३, मुरुड-३, तळा-१,  श्रीवर्धन-३, म्हसळा-३, महाड-४, पोलादपूर-१ असे एकूण ६० नागरिक मृत पावले आहेत. मात्र त्यांना काही ना काही इतर आजार असल्यामुळे ते करोना विरोधातील लढाईत दुर्देवाने यशस्वी होऊ शकले नाहीत.
       आज दिवसातील कोविड बाधित रुग्ण संख्येत पनवेल मनपा-५६, पनवेल (ग्रा)-९, उरण-४, कर्जत-२, पेण-८, तळा-२, अशा प्रकारे एकूण ८२ ने वाढ झाली आहे.
        आजच्या दिवसात पनवेल (मनपा)-३, तळा-१ अशा ४ व्यक्तीची मृत व्यक्ती म्हणून नोंद झालेली आहे.
        आतापर्यंत जिल्ह्यातून ४५०९ नागरिकांचे स्वाब कस्तुरबा गांधी रुग्णालय, मुंबई येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले असून  तपासणी अंती त्यापैकी ३०६८ नागरिकांचे रिपोर्ट  निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत तर तपासणीअंती  रिपोर्ट  मिळण्यासाठी प्रलंबित असणाऱ्या नागरिकांची संख्या ५५ आहे.