कोरोना योद्धे शिक्षकांनाही ५० लाखांचे विमा कवच – भाजपा शिक्षक आघाडीच्या पाठपुराव्याला यश

कल्याण : कोरोनाच्या ड्युटीवर असणाऱ्या शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही आता ५० लाखांचे विमा कवच मिळणार असून भाजपा शिक्षक आघाडीच्या पाठपुराव्याला यश आले आहे. कोरोनाच्या ड्युटीवर असणाऱ्या शिक्षक

 कल्याण : कोरोनाच्या ड्युटीवर असणाऱ्या शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही आता ५० लाखांचे विमा कवच मिळणार असून भाजपा शिक्षक आघाडीच्या पाठपुराव्याला यश आले आहे. कोरोनाच्या ड्युटीवर असणाऱ्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना १ कोटीचे विमा कवच द्यावे ,अशी मागणी सगळ्यात आधी भाजपा शिक्षक आघाडी व जनता शिक्षक महासंघाचे मुंबई-कोकण विभागाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी केली होती. याविषयीचे निवेदन बोरनारे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, वित्त विभागाचे सचिव यांना पाठविले होते व पाठपुरावा केला होता.

मुंबई मनपा, ठाणे, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर, नवी मुंबई, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर मनपा तसेच राज्यातील अनेक ठिकाणी शिक्षकांना कोरोनाच्या विविध कामांसाठी सेवा अधिग्रहित केल्या आहेत. वित्त विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार हे सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी विमा कवचच्या अंतर्गत येणार असल्याचे भाजपा शिक्षक आघाडीचे मुंबई विभाग सह-संयोजक सचिन पांडे, विजय धनावडे, सुभाष अंभोरे व बयाजी घेरडे यांनी सांगितले.