कल्याणमध्ये बरसल्या पावसाच्या हलक्या सरी

कल्याण : गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात कधी ऊन तर कधी ढगाळ, वातावरणाने उकाडा जाणवत असल्याने लोक हैराण झाले असताना आज दुपारी ३ नंतर ढगाळ वातावरण तयार करत पावसाने आपल्या आगमनाची चाहूल दिली. त्यानंतर

कल्याण : गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात कधी ऊन तर कधी ढगाळ, वातावरणाने उकाडा जाणवत असल्याने लोक हैराण झाले असताना आज दुपारी ३ नंतर ढगाळ वातावरण तयार करत पावसाने आपल्या आगमनाची चाहूल दिली. त्यानंतर दुपारी ४:३० च्या दरम्यान हलक्या सरी बरसवत पावसाचे आगमन झाले . जवळपास १५ मिनिटे पावसानेभागात आपली वर्दी दिली. यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या आणि कोरोनाच्या सावटाखाली असलेल्या नागरिकांत काहीसे चैतन्य पाहयला मिळाले. मातीचा दरवळ सर्वत्र पसरला होता.

गेले अनेक दिवस सर्वत्रच कोरोनाचाच कहर आहे. सतत त्याच त्याच भीतीच्या छायेखाली असणारे आणि लॉकडाऊनमुळे त्रस्त असलेल्या सर्वांना पावसाच्या आगमनाने त्या वातावरनातून काही अंशी का होईना पावसामुळे बदल मिळाला आहे . तसेच लॉक डाऊनही टप्याट्प्याने शिथिल होत आहे .मात्र असे असले तरीही पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आजारांपासून नागरिकांनी स्वत:ला जास्तीत जास्त सुरक्षित ठेवणे हे महत्वाचे ठरणार आहे. तसेच स्वच्छतेबाबत खबरदारी राखण्यासाठी व आपत्कालीन यंत्रणा सुसज्ज ठेवत नियोजन राखणे हे महापालिकेच्या समोर या कठीण काळात मोठे आव्हान ठरणार आहे. अशातच दोन दिवसात संभाव्य चक्रीवादळाचा धोका पाहता प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असली तरी नागरिकांनी सुरक्षितेच्या दृष्टीने घराबाहेर पडू नये, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.