मुलांसाठी बनवा काही वेळातच घरगुती पास्ता

पिझ्झा, पास्ता असे फास्टफुड म्हणलं की मुलांच्या तोंडाला पाणी सुटते. अनेकदा अशा गोष्टी घरात करणे खूप किचकट वाटते. पण आज आपण पास्ता बनवण्याची सोपी पद्धत पाहणार आहोत, चला तर मग सुरवात करूया....

 पिझ्झा, पास्ता असे फास्टफुड म्हणलं की मुलांच्या तोंडाला पाणी सुटते. अनेकदा अशा  गोष्टी घरात करणे खूप किचकट वाटते. पण आज आपण पास्ता बनवण्याची सोपी पद्धत पाहणार आहोत, चला तर मग सुरवात करूया….

 
साहित्य : 
शिमला मिरची – १/२ कप 
वाटाणे – १/२ कप
 गाजर – १/४ कप
 टोमॅटो – १
 लाल तिखट – १/२ टीस्पून
 गरम मसाला – १/२ टीस्पून
 जिरे – १/२ टीस्पून
 राई – १/२ टीस्पून
 कढीपत्ता – थोडेसे
 धणे – मूठभर
 मीठ- चवीपुरते
 केचअप – १ चमचा 
कृती : 
प्रथम पास्ता पाण्यात उकळवा. थोडे मीठ आणि तेल घाला म्हणजे पास्ता एकत्र राहू नये. 
भाज्या बारीक चिरून घ्या आणि बाजूला ठेवा.
 कढईत तेल गरम करून त्यात जिरे, मोहरी, कढीपत्ता घाला आता त्यात चिरलेला कांदा, शिमला मिरची आणि गाजर घाला आणि  बरोबर फ्राय करा.
सर्व मिश्रण मंद आचेवर एक मिनिट शिजू द्या. 
नंतर मटार आणि चिरलेली टोमॅटो घाला.
 मीठ घालून तिखट, गरम मसाला आणि उकडलेला पास्ता घाला. 
नंतर त्यात थोडासा टोमॅटो केचप घाला.
 देसी पास्ता तयार आहे, चिरलेली कोथिंबीर घालून सर्व्ह करा.