जगभरातील रिटेल स्टोर्सबाबत मायक्रोसॉफ्टची मोठी घोषणा

जगभरातील रिटेल स्टोर्सबाबत मायक्रोसॉफ्ट कंपनीने मोठी घोषणा केली आहे. या कंपनीने जगभरातील रिटेल स्टोर्स बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मायक्रोसॉफ्ट.कॉम, एक्सबॉक्स आणि व्हिंडोजी महिन्याला सक्रिय

जगभरातील रिटेल स्टोर्सबाबत मायक्रोसॉफ्ट कंपनीने मोठी घोषणा केली आहे. या कंपनीने जगभरातील रिटेल स्टोर्स बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मायक्रोसॉफ्ट.कॉम, एक्सबॉक्स आणि व्हिंडोजी महिन्याला सक्रिय युजर्सची संख्या १.२ बिलियन आहे. सध्या कोणत्याही प्रकारची कामगार कपात करत नसल्याचे देखील कंपनीने स्पष्ट केले आहे. कंपनीने हे स्टोर्स कधीपासून बंद होतील हे स्पष्ट केलेले नाही. मात्र ग्राहकांना रिटेल स्टोर्समध्ये मिळणाऱ्या सर्व सेवा ऑनलाईन मिळतील, असे कंपनीने सांगितले आहे.     

कोरोना व्हायरसमुळे कंपनीने आपले स्टोर्स बंद केले होते. या काळात मायक्रोसॉफ्टच्या टीमने व्यापारी आणि ग्राहकांना ऑनलाईन मदत केली होती. या टीममध्ये १२० पेक्षा अधिक भाषा समजणारे लोक आहे. तसेच या टीमने हजारो वर्कशॉपचे आयोजन केले होते. मायक्रोसॉफ्टनुसार, ऑनलाईन विक्री मोठ्या प्रमाणात वाढत आहे.  त्यामुळे आमची टीम ग्राहकांना रिटेल स्टोर्सच्या तुलनेत व्हर्च्युअल अधिक उत्तम सेवा देत आहे.  कंपनी जगभरातील सर्व स्टोर्स बंद करणार असून,  फक्त चार स्टोर्स सुरू ठेवणार आहेत. त्याचप्रमाणे कंपनी आता डिजिटल स्टोर्सवर लक्ष देणार असल्याचं सांगतिलं जात आहे.