मुंबईत कोरोनाचे १४४२ नवे रुग्ण, ४८ कोरोनाबाधितांचा मृत्यू

मुंबई :मुंबईमध्ये आज १४४२ नवे रुग्ण सापडल्याने कोरोनाबाधितांची संख्या ४४ हजार ७०४ वर पोहचली आहे. त्याचप्रमाणे ४८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा १४६५ वर पोहोचला आहे.मुंबईमध्ये

मुंबई :मुंबईमध्ये आज १४४२ नवे रुग्ण सापडल्याने कोरोनाबाधितांची संख्या ४४ हजार ७०४ वर पोहचली आहे. त्याचप्रमाणे ४८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा १४६५ वर पोहोचला आहे. मुंबईमध्ये कोरोनाच्या  मागील आठवडयापासून रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत असून आज कोरोना रुग्ण संख्या ४४ हजार ७०४ एवढी  झाली आहे. मुंबईमध्ये आज ४८ जणांचा मृत्यू झाला असून, त्यामध्ये ३३  जणांना दीर्घकाळ आजार होते. यामध्ये ३३ पुरुष तर १५ महिलांचा समावेश आहे.

मृतांमधील सात जणांचे वय ४० वर्षांखाली आहे. तसेच २३ जणाचे वय हे ६० वर्षांवरील, तर १८ जण हे ४० ते ६० वर्षादरम्यान होते. आज मुंबईत कोरोनाचे ८४५ संशयित रुग्ण सापडल्याने मुंबईतील संशयित कोरोना रुग्णांची संख्या ३४ हजार ६५ वर पोहोचली आहे. तसेच ६२६ रुग्णांना घरी सोडण्यात आल्याने आतापर्यंत मुंबईतून तब्बल १८ हजार ०९८ जणांना घरी सोडण्यात आल्याची माहिती पालिकेच्या साथरोग कक्षाकडून देण्यात आली.  दरम्यान, चक्रीवादळ, बुधवारी आणि गुरुवारी सतत कोसळत असलेला पाऊस यामुळे येत्या काही दिवसात कोरोना आजाराबरोबर पावसाळी आजारदेखील वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे, ज्यामुळे मुंबईकरानी आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन पालिका आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.