By नवराष्ट्र | Updated Date: Jul 14 2019 7:37PM |
15

भागलपूर. बिहारच्या भागलपूर येथे राहणाऱ्या एका तरुण वैज्ञानिकाला जगातील सर्वात अद्यावत अंतराळ संशोधन संस्था नासाचे निमंत्रण आले आहे. गोपाल असे या युवकाचे नाव असून नासाने आपल्या नवीन प्रकल्पात त्याची मदत मागितली आहे. या प्रकल्पाचे नाव गोपनियम अलॉय असे आहे. गोपालने या प्रकल्पासाठी आधीच नासाशी संपर्क साधला होता. आता गोपाल या प्रकल्पात नासाची मदत करणार आहे. गोपनियम अलॉय प्रकल्प यशस्वी ठरल्यास सूर्यावर संशोधन करणे सोपे होणार आहे. गोपनियम अलॉय हाफनियम, टेन्टिलुनियम, कार्बन आणि नायट्रोजनचे मिश्रण आहे. गोपालला ही संकल्पना एका हॉलिवूड पटावरून सूचली होती.
डेहराडूनच्या ग्राफिक एरा विद्यापीठातील प्रयोगशाळेत का सुरू
सध्या गोपाल डेहराडूनच्या ग्राफिक एरा विद्यापीठातील प्रयोगशाळेत काम करत आहे. त्याने सांगितल्याप्रमाणे, केळीच्या खोडापासून वीज निर्मिती करणे सोपे आहे. यासाठी केळीच्या खोडात दोन इलेक्ट्रोड लावावे लागतात. हे बाजारात सहज उपलब्ध होऊ शकतात. दोन्ही इलेक्ट्रोडमधून वीजेचे तार जोडून त्यांना बल्बाशी कनेक्ट केल्यानंतर बल्ब पेटतो. आता केळीच्या खोडापासून सॅनिटेरी नॅपकीन, बॅन्डेज, यूरिया, बेबी नॅपकीन बनवण्यावर संशोधन सुद्धा सुरू आहेत. गोपाल यांनी या संशोधनासाठी पेटंट 2018 मध्ये मिळवला आहे. त्यांनी 'पेपर बायो सेल' आणि 'बनाना बायो सेल' यांचा शोध लावल्यानंतर 4 वर्षांसाठी भारत सरकारसोबत करार केला आहे. त्या कराराला केवळ एकच वर्ष झाले आहे.