पालघर जिल्ह्यात गेल्या २४ तासांमध्ये ५२७ नव्या रुग्णांची भर

पालघर : पालघर जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत चालला आहे. गेल्या २४ तासांमध्ये जिल्ह्यात ५२७ नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातली कोरोना विषाणू बाधितांची संख्या आता ५७६६

पालघर : पालघर जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत चालला आहे. गेल्या २४ तासांमध्ये जिल्ह्यात ५२७ नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातली कोरोना विषाणू बाधितांची संख्या आता ५७६६ वर पोहचली असून आतापर्यंत १३७ जणांचा मृत्यु झाला आहे. तर कोरोनामुक्त झालेल्या २७१५ जणांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

सर्वात जास्त कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या वसई- विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातली असून ती ४६२८ इतकी आहे. तिथे आतापर्यंत ११९ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात पालघर ग्रामीण भागात सद्यस्थितीत २५८ इतकी प्रतिबंधित क्षेत्रे आहेत.