पनवेल महापालिका क्षेत्रात ८ दिवसांसाठी अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण लॉकडाऊन करा – प्रितम म्हात्रे

पनवेल( : पनवेल महानगरपालिका क्षेत्रात २४ जूनला तब्बल ९५ कोरोना रुग्णांची वाढ झाली असून वाढती रुग्णसंख्या कमी होण्याच्या दृष्टिकोनातुन पुन्हा किमान ८ दिवस अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण लॉकडॉऊन

 पनवेल( : पनवेल महानगरपालिका क्षेत्रात २४ जूनला तब्बल ९५ कोरोना रुग्णांची वाढ झाली असून वाढती रुग्णसंख्या कमी होण्याच्या दृष्टिकोनातुन पुन्हा किमान ८ दिवस अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण लॉकडॉऊन करण्यात यावे, अशी मागणी विरोधी पक्षनेता प्रितम म्हात्रे यांनी पालिका आयुक्तांकडे आणि रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांच्याकडे ईमेल द्वारे  केली आहे.         

पनवेल महानगरपालिका हद्दीत दिवसेंदिवस कोरोनाचा कहर वाढत चाललेला दिसून येत आहे. दररोज जवळपास शंभर नागरिक कोरोनाग्रस्त आढळून येत आहेत. त्यामुळे पनवेल महानगरपालिका हद्दीत लॉकडाऊन करण्यात यावे अशी मागणी पालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांनी आयुक्तांकडे केली आहे. दिवसागणिक पनवेल महानगरपालिका हद्दीत कोरोनाचे रुग्ण अधिक सापडू लागले आहेत. त्यामुळे भयावह स्थिती निर्माण झालेली आहे. मार्केटमध्ये नागरिक मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी घराबाहेर पडताना दिसत आहेत. त्यामुळे बाजारात मोठी गर्दी होत आहे तसेच वाहनांचीदेखील वर्दळ वाढलेली असल्याने वाहतूक कोंडी सतावू लागली आहे. विविध ठिकाणी नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करत असल्याने कोरोनाचा संसर्ग वाढू लागलेला आहे.  त्यामुळे महानगरपालिका हद्दीतील कोरोना पेशंटची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. लॉकडाऊनच्या काळात रुग्णांची संख्या २० ते २५ च्या घरात होती. मात्र लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर ग्रामीण आणि शहरी भागात झपाट्याने कोरोना रुग्णांची संख्या वाढत गेली. याला  आळा बसावा व कोरोना रुग्णांची साखळी तुटावी यासाठी पनवेल महानगरपालिकेने आठ दिवसांसाठी अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण लॉकडाऊन करण्याची मागणी पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांनी पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे ईमेलद्वारे केलेली आहे.