रायगड जिल्ह्यात २६६ नवे कोरोना रुग्ण

पनवेल :रायगड जिल्ह्यात आज २६६ नवीन रुग्ण सापडले असून १११ रुग्ण बरे झाल्याने घरी गेले आहेत. रायगड जिल्ह्यात आणि पनवेल तालुक्यात कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या पाहून जिल्ह्यात भीतीचे वातावरण

 पनवेल :रायगड जिल्ह्यात आज २६६ नवीन रुग्ण सापडले असून १११ रुग्ण बरे झाल्याने घरी गेले आहेत. रायगड जिल्ह्यात आणि पनवेल तालुक्यात कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या पाहून जिल्ह्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. आज पनवेल महापालिका क्षेत्रात १३६ पनवेल ग्रामीणमध्ये ३१ ,पेण २० , रोहा १९ ,  उरण १५, खालापूर १५, माणगाव १५, कर्जत ९, सुधागड २, श्रीवर्धन ३ आणि तळा येथे एक रुग्ण सापडला आहे . रायगड जिल्ह्यात  कोरोनाच्या रुग्णांची एकूण संख्या ४२१२  झाली असून जिल्ह्यात १३४ जणांचा मृत्यू झाला आहे. 

रायगड जिल्ह्यात  बुधवारी  कोरोनाचे २६६  नवीन रुग्ण सापडले असून १११ जणांनी कोरोनावर मात केली आहे . पनवेल तालुक्यात १६७  नवीन रुग्ण सापडले असून पनवेल महापालिका क्षेत्रात १३६ नवीन रुग्ण सापडले आहेत. आज जिल्ह्यात एकाही कोरोनाबाधित व्यक्तीच्या मृत्यूची नोंद झाली नाही . 

पनवेल ग्रामीणमध्ये ३१,पेण २० , रोहा १९ , उरण १५ , खालापूर १५ , माणगाव १५ , कर्जत ९, सुधागड २ ,श्रीवर्धन ३ ,आणि तळा येथे एक रुग्ण सापडला आहे रायगड जिल्ह्यात बुधवार पर्यंत ९६०७  टेस्ट करण्यात आल्या असून त्यापैकी ४२१२ पॉझिटिव्ह आल्या आहेत. १६५  टेस्टचे रिपोर्ट अद्याप बाकी आहेत. कोरोनावर २४४८  जणांनी मात केली असून १६३० रुग्णांवर उपचार सुरू आहेत  जिल्ह्यात १३४  जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.