लघु उद्योजकांना मदत मिळावी यासाठी राजू बागवान यांचे रोहित पवारांना निवेदन

कर्जत : कुल्फीचा व्यवसाय करणारे राजु बागवान यांनी आपल्या व्यवसायाचे मोठे नुकसान झाले असून आपल्याला मदत मिळावी यासाठी आमदार रोहित पवार यांना निवेदन देऊन त्याचे लक्ष वेधले.

 कर्जत : कुल्फीचा व्यवसाय करणारे राजु बागवान यांनी आपल्या व्यवसायाचे मोठे नुकसान झाले असून आपल्याला मदत मिळावी यासाठी आमदार रोहित पवार यांना निवेदन देऊन त्याचे  लक्ष वेधले. 

उन्हाळ्यात सर्वात महत्त्वाचा व्यवसाय असलेल्या कोल्ड्रिंक, कुल्फी, आईस्क्रीम, लस्सी, आदी विविध प्रकारच्या व्यवसायाला कोरोना महामारी मुळे मोठे नुकसान सोसावे लागले आहे, हे सर्व छोटे व्यवसायिक अत्यंत अडचणीत सापडले असून नेमके उन्हाळ्यातच कोरोना चा पादर्भावामुळे  उन्हाळी सिझन होऊ शकलेला नाही, त्यामुळे कुल्फी व्यावसायिांवर 
  बँकांचे खाजगी बँकाचे, सावकाराचे कर्ज काढून व्यवसाय करणारे व्यावसायिकाना महाराष्ट्र शासनाने मदतीचा हात देण्याची गरज असून यासाठी कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी विधानमंडळात आवाज उठवणे गरजेचे आहे यासाठी आज कर्जत तालुका कोल्ड्रिंग असो च्या वतीने ए वन कुल्फी चे संचालक व माजी उपसरपंच राजू बागवान यांनी आमदार रोहित पवार यांना निवेदन दिले. यावेळी सचिन सोनमाळी, भाऊसाहेब तोरडमल, भास्कर भैलूमे आदी उपस्थित होते.  सर्व व्यावसायिकांचे लायसन तपासून अथवा दुकानांचे परवाने पाहून या सर्वांना शासनाची अधिकृत मदत द्यावी अथवा अनुदान द्यावे व यांना इतर व्यवसाय करण्यासाठी मदत द्यावी अशी मागणी यावेळी त्यांनी केली आहे. कोरोनाची महामारी नेमकी येन उन्हाळ्यात सूरु झाली यात सर्व व्यवसाय कमी जास्त प्रमाणात सुरू असताना थंड पासून कोरोना वाढण्याचा धोका चर्चेत आला व लोकांनीच सर्व थंड पेयावर कुल्फी कडे पाठ फिरवली त्यामुळे या व्यवसाया वर मोठी संक्रांत आली असून वर्षातील चार महिनेच चांगला व्यवसाय असणार्या या सीझनेबल व्यवसायाला शासनाने मदतीचा आधार द्यावा अशी मागणी बागवान यांनी केली आहे.
 
 
कोरोना विषाणू च्या संसर्गाच्या भितीने देशात लाॅकडाऊन करावे लागले कुल्फी व इतर थंड पेय  अस्क्रीम लस्सी चा सिजन हा उन्हाळ्यात असतो नेमके लाॅकडाऊन पडले त्यामुळे पुर्ण सिजन वाया गेला त्या मुळे या व्यवसायावर अवलंबून असणारे अनेक कुटूंबावर उपासमारीची वेळ आली त्यामुळे सरकारने मदत करावी यासाठी सरकारला साकडे घालून मदत मिळवून देण्यासाठी आमदार रोहित पवार यांना निवेदन देऊन लक्ष वेधले आहे
    राजू बागवान
 कुल्फी व्यावसायिक