By नवराष्ट्र | Updated Date: Oct 8 2019 4:22PM |
7
नवी दिल्ली :आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे नाव उंचावणाऱ्या बॅडमिंटनपटू सायना नेहवालला एका विचित्र प्रसंगाला तोंड द्यावे लागत आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या सायना पुढील आठवड्यात डेन्मार्क ओपन स्पर्धेत सहभागी होणार आहे. स्पर्धा तोंडावर आली असताना देखील सायनाला अद्याप डेन्मार्कचा व्हिसा मिळालेला नाही.
आतापर्यंत अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सायनाने देशाची मान उंचावेल,अशी कमगिरी केली आहे. पण डेन्मार्क येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी तिला अद्याप व्हिसा मिळालेला नाही. व्हिसा मिळवण्यासाठी सायनाला सोशल मीडियाचा आधार घ्यावा लागला आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडे मदत मागावी लागली. सायनाने परराष्ट्र मंत्री जयशंकर यांना ट्वीट करून सांगितले की, मला आणि माझ्या ट्रेनरला डेन्मार्कला जाण्यासाठी व्हिसा हवा आहे. तो लवकरात लवकर मिळावा,अशी विनंती. ही स्पर्धा पुढील आठवड्यात हेणार आहे आणि अद्याप आम्हाला व्हिसा मिळालेला नाही. आमचा सामना मंगळवारपासून सुरू होत आहे.