स्वराज्यजननी जिजामाता या मालिकेचे चित्रीकरण सुरू

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे तीन महिने सगळे बंद होते. मात्र आता सगळ्या गोष्टी सुरळीत व्हायला सुरुवात झाली आहे. मालिकांच्या चित्रीकरणालाही सुरुवात झाली आहे. सोनी मराठी वाहिनीवरील स्वराज्यजननी

 कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे तीन महिने सगळे बंद होते. मात्र आता सगळ्या गोष्टी सुरळीत व्हायला सुरुवात झाली आहे. मालिकांच्या चित्रीकरणालाही सुरुवात झाली आहे. सोनी मराठी वाहिनीवरील स्वराज्यजननी जिजामाता या मालिकेचे चित्रीकरण सर्व नियम पाळून मुंबईत सुरु झाले आहे. तीन महिन्यानंतर कामाला सुरुवात केल्याने मालिकेच्या टीममधील प्रत्येकजण खूप उत्साही आहे.

जिजामातांच्या आयुष्यावर आधारित स्वराज्यजननी जिजामाता या मालिकेचे चित्रीकरण दादासाहेब फाळके चित्रनगरी येथे सुरु आहे. मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हे चित्रीकरण सुरु आहे. डॉ. अमोल कोल्हे यांची ही मालिका असुन चित्रीकरण सुरु करण्याआधी त्यांनी सेटवरच्या सगळ्यांना सुरक्षिततेबाबतचे नियम समजावून सांगितले. सगळ्यांनी नियम पाळून चित्रीकरण करण्याचे ठरवले आहे. स्वराज्यजननी जिजामाता ही मालिका सोमवार ते शनिवार सोनी मराठीवर रात्री ८.३० वाजता दिसणार आहे.