”या” शहराची कोरोनामुक्तीकडे वाटचाल

राज्यात कोरोनाचा संसर्ग राज्यात कोरोनाचा संसर्ग दिवसागणिक वाढत चालला आहे. त्याचप्रमाणे राज्यातील काही जिल्हे आणि शहरे यांनी कोरोनावर मात केल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याचप्रमाणे

राज्यात कोरोनाचा संसर्ग  राज्यात कोरोनाचा संसर्ग दिवसागणिक वाढत चालला आहे. त्याचप्रमाणे राज्यातील काही जिल्हे आणि शहरे यांनी कोरोनावर मात केल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याचप्रमाणे अजून एका शहराने कोरोना विषाणूवर मात केल्याची माहिती समोर आली आहे. ती म्हणजे यवतमाळ. कोरोना जिल्ह्याच्या ग्रामीण भागात फोफावत असताना यवतमाळ शहरवासीयांनी अवघ्या एक महिन्यानंतर कोरोना विषाणूवर मात केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.   

गेल्या २९ दिवसांपासून यवतमाळ शहरात एकाही कोरोनाग्रस्ताची नोंद वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाकडे झालेली नाही. त्यामुळे येत्या सोमवारपर्यंत शहरातील प्रतिबंधित भागातील निर्बंध पूर्णपणे उठण्याची शक्यता आहे. यवतमाळ शहरातील ९८ व्यक्तींना कोरोनाने आपल्या विळख्यात घेतले. सुदैवाने या सर्वांनी कोरोनाशी दोन हात करून ही लढाई जिंकली. या काळात इंदिरा नगर आणि पवारपुरा या परिसराची केंद्र सरकारकडे कोरोना हॉटस्पॉट म्हणून नोंद झाली. इंदिरा नगरमध्ये तब्बल ६१ आणि पवारपुरा परिसरात करोनाचे २० रूग्ण आढळले. यातील बहुतांश रूग्ण हे ‘मरकज’हून यवतमाळात परतल्यानंतर कोरोनाबाधित आढळलेल्या रूग्णांच्या निकटच्या संपर्कात आलेले होते.

गेल्या १५ मे रोजी शहरातील इंदिरा नगर भागातून अखेरचा रूग्ण वैद्यकीय महाविद्यालयात दाखल झाला होता. उद्या १३ जून रोजी यवतमाळ शहरात एकाही कोरोनाबाधिताची नोंद न होण्यास २९ दिवस पूर्ण होतील. रूग्णांची संख्या कमी झाल्यानंतर बहुतांश भागातील प्रतिबंध प्रशासनाने टप्याटप्याने हटवले. सध्या केवळ इंदिरानगरातील काही भागात हे प्रतिबंध कायम आहेत.  या रूग्णासही उपचारानंतर सुट्टी होऊन १४ दिवस झाले आहेत. त्यामुळे सध्याच्या घडीला यवतमाळ शहरातील केवळ एक परिचारिका वगळता एकही कोरोनाबाधित रूग्ण वैद्यकीय महाविद्यालयात दाखल नाही. त्यामुळे येत्या सोमवारपर्यंत यवतमाळ शहर पूर्णपणे कोरोनामुक्त होईल असं समजलं जात आहे.