By नवराष्ट्र | Updated Date: Sep 26 2019 7:26PM |
39

वास्तुशास्त्रामध्ये घराची नकारात्मक ऊर्जा दूर करून सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी विविध टिप्स सांगण्यात आल्या आहेत. ज्या घरामध्ये वास्तुदोष असेल तेथे नकारात्मकता कायम राहते. सकारात्मकता वाढवण्यासाठी वास्तूच्या काही खास वस्तूंविषयी.... एकाग्रता आणि घरातील सकारात्मकता वाढवण्यासाठी घरात पिरॅमिड ठेवू शकता. लक्षात ठेवा, पिरॅमिड तांबे, पितळ किंवा पंचधातूचे ठेवणे अत्यंत शुभ राहते. घरामध्ये कधीही लोखंड किंवा ऍल्युमिनिअमचा पिरॅमिड ठेवू नये. घरामध्ये लाकडाचा पिरॅमिड ठेवणेही शुभ मानले जाते.
घरामध्ये पावित्र्य कायम ठेवण्यासाठी गंगाजल कलश ठेवावा. घरामध्ये मुख्यद्वारावर आंब्यांचे पानांचे तोरण बांधावे. याच्या प्रभावाने घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते आणि नकारात्मक ऊर्जा बाहेरच राहते.
देवघरामध्ये नारळ, चांदीचे नाणे ठेवणे अत्यंत शुभ राहते. देवघरामध्ये चांदीच्या मूर्ती ठेवून पूजा करावी. पूजन कर्मासाठी चांदी सर्वात उत्तम धातू मानला जातो.
घराच्या मुख्यद्वारावर स्वस्तिक काढावे. याच्या शुभ प्रभावाने घरात नकारात्मकता प्रवेश करत नाही. दारासमोर महालक्ष्मीचे चरण चिन्ह काढावेत. हे शुभ चिन्ह घराच्या सुख-समृद्धीमध्ये वृद्धी करणारे मानले जातात. दारावर 'ऊँ' चिन्हही काढू शकतात.
श्रीकृष्णाचा सुंदर फोटो घरात लावल्याने मानसिक तणाव दूर होऊ शकतो. फोटोमध्ये गोमाता, बासरी वाजणारे श्रीकृष्ण असावेत. असा फोटो मनाला शांती देतो आणि घरातील वातावरण सकारात्मक बनवतो.