दिल्ली व्यापार मुंबई

लो जी सुनलो इनकी बातनरेंद्र मोदी चहावाला नव्हते तर आमचे वडील चहावाले होते, पंतप्रधानांच्या सख्ख्या भावाचा गौप्यस्फोट
प्रल्हाद मोदी हे आज उल्हासनगर ट्रेड असोसिएशनने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमासाठी उल्हासनगरला आले होते. यावेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘चायवाला’ म्हणण्यापेक्षा ‘चायवाले का बेटा’ म्हणा असं प्रल्हाद मोदी म्हणाले. आम्ही सर्व भावंड मिळून चहा विकायचो. ज्यादिवशी ज्याचा नंबर लागेल, त्याच्यावर चहा विकायची जबाबदारी यायची. पण चहावाला आम्ही नव्हतो, तर आमचे वडील होते. त्यामुळे आम्ही सर्व ‘चायवाले के बेटे’ आहोत, असं ते म्हणाले.