पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांचा जीव भांड्यात पडला, मध्य रेल्वेच्या दोन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक; वेळापत्रक पाहून मगच मार्गक्रमण निश्चित करा

सकाळी १०.४३ ते दुपारी ३.४६ दरम्यान मुलुंड येथून सुटणारी डाऊन धीम्या /अर्धजलद सेवा मुलुंड ते कल्याण स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळविली जाईल आणि ठाणे, दिवा, डोंबिवली स्थानकांवर थांबून वेळापत्रकपेक्षा १० मिनिट उशिराने गंतव्यस्थानी पोहोचेल.

    मुंबई : मध्य रेल्वेतर्फे मुंबई विभागात आज विविध अभियांत्रिकी व देखभाल कामांसाठी आपल्या उपनगरी भागांवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

    मेन रेल्वे मार्ग Mega Block On Main Railway Line

    ठाणे- कल्याण अप व डाऊन धीम्या मार्गावर सकाळी ११.०० ते संध्याकाळी ४.०० या वेळेत

    सकाळी १०.४३ ते दुपारी ३.४६ दरम्यान मुलुंड येथून सुटणारी डाऊन धीम्या /अर्धजलद सेवा मुलुंड ते कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळविली जाईल आणि ठाणे, दिवा, डोंबिवली स्थानकांवर थांबून वेळापत्रकपेक्षा १० मिनिट उशिराने गंतव्यस्थानी पोहोचेल.

    कल्याण येथून सकाळी १०.३७ ते दुपारी ३.५१ या वेळेत सुटणारी अप धीम्या /अर्धजलद सेवा कल्याण व मुलुंड स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळविल्या जातील व डोंबिवली, दिवा, ठाणे स्थानकांवर थांबतील आणि पुढे मुलुंड स्टेशन येथे अप धीम्या मार्गावर पुन्हा वळविण्यात येतील. या गाड्या वेळापत्रकापेक्षा १० मिनिट उशिराने गंतव्यस्थानावर पोहोचतील.

    हार्बर रेल्वे मार्ग Mega Block On Harbour Railway Line

    पनवेल-वाशी अप व डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११.०५ ते संध्याकाळी ४.०५ दरम्यान (बेलापूर / नेरुळ-खारकोपर सेक्शन सह)

    अप हार्बर मार्गावरील पनवेल/बेलापूर येथून सकाळी १०.४९ ते संध्याकाळी ४.०१ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस करीता सुटणाऱ्या सेवा व डाऊन हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०.०३ ते दुपारी ३.१६ दरम्यान बेलापूर/पनवेल करीता सुटणाऱ्या सेवा रद्द राहतील.

    अप ट्रान्स हार्बर मार्गावरील सेवा ठाणे करिता पनवेल येथून सकाळी ९.०१ ते दुपारी ३.५३ पर्यंत सुटणाऱ्या सेवा आणि डाऊन ट्रान्स हार्बर मार्गावरील पनवेल करिता ठाणे येथून सकाळी १०.०१ ते दुपारी ३.२० पर्यंत सुटणाऱ्या सेवा रद्द राहतील.

    बीएसयू अप मार्गावर खारकोपर येथून सकाळी १०.४५ ते संध्याकाळी ४.०० वाजेपर्यंत नेरुळ/बेलापूरसाठी सुटणारी सेवा आणि बीएसयू डाऊन मार्गावर नेरुळ/बेलापूरसाठी येथून सकाळी १०.१५ ते दुपारी ३.३२ या वेळेत सुटणारी सेवा रद्द राहतील.

    ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- वाशी विभागात विशेष गाड्या चालवल्या जातील. ब्लॉक कालावधीत ठाणे- वाशी / नेरूळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा उपलब्ध असतील.

    पश्चिम रेल्वे मार्ग Western Railway Line

    पश्चिम रेल्वे मार्गावर आज कोणताही जम्बोबलॉक घेण्यात येणार नाही.

    The passengers on the Western Railway were no worried megablocks today on both routes of the Central Railway Just look at the schedule and then decide the route