uday samant

कोरोनामुळे पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमुळे राज्यातील प्राध्यापक भरती रखडली होती. मात्र आता तज्ज्ञ समितीने या प्राध्यापक भरतीला मान्यता दिली आहे. आता ती फाईल वित्त विभागाकडे पाठवण्यात आली आहे. येत्या दोन तीन दिवसात त्याला मंजुरी मिळेल. त्यानंतर पहिल्या टप्प्यात प्राध्यापक भरतीला सुरुवात होईल, असे उदय सामंत म्हणाले.

    येत्या दोन तीन दिवसात मंजुरी मिळाल्यानंतर पहिल्या टप्प्याच्या प्राध्यापक भरतीला सुरुवात होईल. तसेच तासिका प्राध्यापकांच्या मानधनात वाढ केली जाईल, अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली. गोंदियात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत उदय सामंत म्हणाले.

    कोरोनामुळे पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमुळे राज्यातील प्राध्यापक भरती रखडली होती. मात्र आता तज्ज्ञ समितीने या प्राध्यापक भरतीला मान्यता दिली आहे. आता ती फाईल वित्त विभागाकडे पाठवण्यात आली आहे. येत्या दोन तीन दिवसात त्याला मंजुरी मिळेल. त्यानंतर पहिल्या टप्प्यात प्राध्यापक भरतीला सुरुवात होईल, असे उदय सामंत म्हणाले.

    मराठा समाजासोबत संपूर्ण महाविकास आघाडी सरकार आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी राज्य सरकार रिट पेटीशन दाखल करणार आहे. छत्रपती घराण्यातील संभाजी राजेंना पंतप्रधानांनी वर्ष दीड वर्ष भेट न देणं हा महाराष्ट्रातील तमाम जनतेचा अपमान असल्याची टिका उदय सामंत यांनी केली.