प्रसुतीसाठी रुग्णालयात दाखल झालेल्या महिलेवर डॉक्टरने केला प्रयोग, आला अंगलट ; डॉक्टरांवर गंभीर आरोप

सर्जरी दरम्यान डॉक्टरांनी या महिलेच्या परवानगीशिवायच तिची नसबंदी केली. महिलेच्या आरोपांनंतर आरोग्य विभागानं तपास करण्याचा दावा केला आहे. तर, रुग्णालयातील डॉक्टरांनी महिलेचे आरोप फेटाळून लावले आहेत. रुग्णालयाचे उपाधीक्षक डॉ. सव्यसाची मंडल यांनी सांगितलं, की या ऑपरेशनसाठी महिलेची सहमती गरजेची असते. या महिलेच्या संमतीनंतरच नसबंदी करण्यात आली आहे.

    रांची : एका महिलेनं डॉक्टरांवर (Doctor) गंभीर आरोप केले आहेत. या महिलेच्या म्हणण्यानुसार, प्रसूतीसाठी ती रुग्णालयात दाखल झाली होती. मात्र, डॉक्टरांनी तिच्या परवानगीशिवायच तिची नसबंदी केली (Sterilization of Pregnant Woman) आहे. हे प्रकरण रांचीमधील एका रुग्णालयातील आहे. कांटा टोली येथील पूनम देवी ही गर्भवती महिला प्रसुतीसाठी रुग्णालयात दाखल झाली होती. डॉक्टरांनी तिला सिझेरियन ऑपरेशनची गरज असल्याचं सांगितलं होतं.

    महिलेनं असा आरोप केला आहे, की सर्जरी दरम्यान डॉक्टरांनी या महिलेच्या परवानगीशिवायच तिची नसबंदी केली. महिलेच्या आरोपांनंतर आरोग्य विभागानं तपास करण्याचा दावा केला आहे. तर, रुग्णालयातील डॉक्टरांनी महिलेचे आरोप फेटाळून लावले आहेत. रुग्णालयाचे उपाधीक्षक डॉ. सव्यसाची मंडल यांनी सांगितलं, की या ऑपरेशनसाठी महिलेची सहमती गरजेची असते. या महिलेच्या संमतीनंतरच नसबंदी करण्यात आली आहे.

    सदर रुग्णालयात रांचीच्या कांटा टोली येथील पूनम देवी डिलिव्हरीसाठी दाखल झाली होती. डॉक्टरांनी तिला सिझेरियन ऑपरेशनची गरज असल्याचं सांगितलं. पीडित पुनमनं म्हटलं, ऑपरेशननंतर तिला सांगण्यात आलं, की तिची नसबंदीही करण्यात आली आहे. या महिलेच्या म्हणण्यानुसार, डॉक्टरांनी या महिलेच्या आणि तिच्या पतीच्या परवानगीशिवाय ही नसबंदी केली आहे. सिव्हिल सर्जनला महिलेच्या या आरोपाबाबत विचारलं असता त्यांनी म्हटलं, की महिलेच्या परवानगीशिवाय हे ऑपरेशन केलं जाऊ शकत नाही. मात्र, आता महिला याबाबत तक्रार करत असल्यानं प्रकरणाची चौकशी करण्यात येईल.

    without permission of a pregnant woman doctors did sterilization