मणिपूरमध्ये काँग्रेसच्या माजी अध्यक्षांच्या हाती कमळ, विष्‍णूपरमधून तब्बल ६ वेळा आमदार

मणिपूरचे काँग्रेसचे माजी अध्यक्ष गोविंददास कोंटौजम यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली असून कमळ हाती घेतले आहे. तसेच विष्णूपर विधानसभा मतदार संघातून ते ६ वेळेस आमदार म्हणून निवडून आले आहेत. 

    उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड आणि काही राज्यांमध्ये विधानसभेची निवडणुक आगामी वर्षात होणार आहे. परंतु मागील काही महिन्यांपासूनच या राज्यांमध्ये निवडणुकीचे वारे धुमत आहेत. या निवडणुकीपूर्वी भाजपा आपला गढ अधिक मजबूत करण्यासाठी जोरदार हालचाली करत आहे.

    दरम्यान, मणिपूरचे काँग्रेसचे माजी अध्यक्ष गोविंददास कोंटौजम यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली असून कमळ हाती घेतले आहे. तसेच विष्णूपर विधानसभा मतदार संघातून ते ६ वेळेस आमदार म्हणून निवडून आले आहेत.

    मागील वर्षातल्या डिसेंबर महिन्यात काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी कोंटौजम यांची प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली होती. मणिपूर मध्ये आगामी वर्षात निवडणूका होणार आहेत. त्यामुळे आता मोठा झटका काँग्रेसला बसणार आहे.

    आज दुपारी दिल्लीतील भाजपाच्या हेड क्वार्टरवरमध्ये भाजपा पक्षात त्यांनी प्रवेश केला आहे. यावेळी भाजपाचे अनेक ज्येष्ठ नेते सुद्धा उपस्थित होते. मणिपूरचे मुख्यमंत्री एन बीरेन सिंग यांनी कोंटौजम यांना भाजपामध्ये सहभागी करून घेतलं.