विराट कोहलीने RCBच्या जर्सीमध्ये केले मोठे बदल, KKR समोर तगडं आव्हान

आरसीबीचा कर्णधार विराट कोेहली (Virat Kohli) आणि चेअरमन प्रथमेश मिश्रा यांनी 'स्पेशल ब्लू जर्सी' (Special Blue Jersey) चं अनावरण केलं आहे. त्यामुळे २० सप्टेंबर रोजी केकेआर (Kolkata Knight Riders) विरूद्ध होणाऱ्या सामन्यात विराटसेना ब्लू जर्सीमध्ये दिसणार आहे.

    दुबई : IPL 2021 चं दुसरं सत्र उद्यापासून सुरू होणार आहे. यामध्ये पहिला सामना मुंबई आणि चेन्नईमध्ये (MI Vs CSK) खेळला जाणार आहे. परंतु यंदाच्या आयपीएलमध्ये आरसीबी (Royal Challengers Bangalore) टीम वेगळ्याच रूपात आणि रंंगात पाहायला मिळणार आहे. आरसीबीचा कर्णधार विराट कोेहली (Virat Kohli) आणि चेअरमन प्रथमेश मिश्रा यांनी ‘स्पेशल ब्लू जर्सी’ (Special Blue Jersey) चं अनावरण केलं आहे. त्यामुळे २० सप्टेंबर रोजी केकेआर (Kolkata Knight Riders) विरूद्ध होणाऱ्या सामन्यात विराटसेना ब्लू जर्सीमध्ये दिसणार आहे.

    Virat Kohli ने श्रीलंकेचे खेळाडू वानिंदू हसरंगा (Wanindu Hasaranga) आणि दुशमंथा चमीरा (Dushmantha Chameera) यांच्या आगमनाने संघाला एक नवीन ऊर्जा मिळणार आहे. आयपीएल २०२१ च्या पहिल्या टप्प्यातील चांगल्या कामगिरीला ते उत्तेजन देणार आहेत.

    आयपीएल २०२१ च्या पहिल्या टप्प्यात मे महिन्यात बायो-बबलमध्ये कोरोना व्हायरस संसर्गाची अनेक प्रकरणे आढळल्यानंतर हंगाम पुढे ढकलण्यात आला आहे. तसेच उर्वरित सामने रविवारपासून यूएईमध्ये खेळले जातील.