किरीट सोमय्या यांना कराड पोलिसांनी रेल्वेतून उतरवत घेतलं ताब्यात, कोल्हापुरात कलम 144 लागू

दरम्यान, या अटकेनंतर आता सोमय्या यांनी “पोलिसांनी मला निषेधाच्या आदेशान्वये कराडल थांबवले 9 वाजता कराड सर्किट हाऊसला मी पत्रकार परिषदेत हसन मुश्रीफ यांचा आणखी एक घोटाळा उघड करणारं.” असंल्याचं ट्वीट करत जाहिर केलं आहे.

    भाजप नेते किरीट सोमय्या यांना सातारा जिल्ह्यातील कराड रेल्वे स्टेशनवर गाडीतून खाली उतरवत ताब्यात घेतलं आहे. आज ते कोल्हापुरला जाऊन गृहमंत्री हसन मुश्रीफ यांचा भ्रष्टाचार उघड करणार होते. कोल्हापुर जिल्हाधिकाऱ्यांनी सोमय्या यांना कायदा व सुव्यवस्थेचे कारण देत लोक एकत्र येऊ नयेत म्हणून जिल्हाबंदी कोली आहे. आणि 20 आणि 21 सप्टेंबर रोजी कलम 144 लावले आहे.

    किरीट सोमय्या यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावले होते. मंत्री मुश्रीफ हे विवीध भ्रष्टाचारात सहभागी असून त्यांनी नातेवाईकांच्या नावावर बेनामी मालमत्ता ठेवल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता. सोमय्या आज सोमवारी कोल्हापूर जिल्ह्याला भेट देणार होते. व कोल्हापूरात पत्रकार परिषद घेत मुश्रीफ यांचा भ्रष्टाचार उघड करणार होते.

    कोल्हापुरचे जिल्हाधिकारी राहुल रेखवार यांनी 19 सप्टेंबर रोजी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की, सोमय्या यांच्यावर आयपीसी कलम १४४ अन्वये “त्यांच्या जीवाला धोका असल्याने आणि त्यांच्या दौऱ्या दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्याता असल्याने त्यांना जिल्हाबंदी करण्यात येत आहे.”

    दरम्यान, या अटकेनंतर आता सोमय्या यांनी “पोलिसांनी मला निषेधाच्या आदेशान्वये कराडल थांबवले 9 वाजता कराड सर्किट हाऊसला मी पत्रकार परिषदेत हसन मुश्रीफ यांचा आणखी एक घोटाळा उघड करणारं.” असंल्याचं ट्वीट करत जाहिर केलं आहे.