राज्यसभा पोटनिवडणूकीच्या मतदानाच्या दिवशीच विशेष सत्र बोलावून विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होण्याची शक्यता? : सूत्रांची माहिती

विधानसभेत नियम मांडल्यानंतर ते मंजूर झाले तरी दहा दिवसांनंतर प्रत्यक्षात येतात. मात्र, विधानसभेत हा नियम बदलण्यासाठी ठराव करण्याची सोय आहे. त्यामुळे विशेष अधिवेशन घेवून विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक निवडणूक जिंकण्याचा विचार महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केला जात आहे. या बाबत राज्यसभा नामांकनाची प्रक्रिया पूर्ण होत असतानाच निर्णय येत्या दोन दिवसांत होण्याची शक्यता आहे अशी माहिती सुत्रांनी दिली.

    मुंबई : महाविकास आघाडी आणि विरोधीपक्ष भाजप यांच्यात सातत्याने ठणाठणी होत असतानाच कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्यावरून विशेष अधिवेशन घ्या असे सांगत राज्यपालांनी भर घातली आहे. त्यातच राज्यपालांच्या पत्राला तातडीने जाहीरपणे राजकीय भाषेत उत्तर देत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी नव्या वांदगाची फोडणी दिली आहे. या सा-या घडामोडी होत असतानाच येत्या चार ऑक्टोबरला राज्यसभेच्या पोटनिवडणूकीच्या मतदानासाठी दोन्ही बाजूचे आमदार हजर राहणार आहेत. ही संधी साधत विधानसभेचे एक दिवसांचे विशेष सत्र बोलावून अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

    विधानसभा अध्यक्षपदासाठी विशेष अधिवेशन

    पावसाळी अधिवेशनातच याबाबत विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत विशेष अधिवेशन घेण्याचा मुद्दा मांडण्यात आला होता. त्यानंतर निवडणुकीचे नियम विधानसभेच्या विषय नियामक समितीत बदलण्यात आले आहेत. जुन्या नियमांनुसार विधानसभेचा अध्यक्ष निवडण्यासाठी अधिवेशन कार्यकाळात ४८ तासांची सूचना आवश्यक होती. तसेच आवाजी मतदानाने ही निवड करण्याची तरतूद त्यात करण्याचा बदल विषयनियामक समितीने केला आहे. त्यामुळे सध्या भाजपचे आमदार निलंबित असल्याने अध्यक्षांची निवड करणे सहज सोपे होणार आहे. शिवाय, विशेष सत्र बोलावण्याचा राज्य सरकारचा हेतू मतदानाची वेळ आल्यास सर्व आमदार हजर होतील त्याच दिवशी अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याबद्दल विचार सुरु आहे.

    निर्णय येत्या दोन दिवसांत