सरकारी कर्मचाऱ्यांना DA मध्ये ३ टक्के वाढ होण्यापूर्वी मिळणार ‘हे’ ५ फायदे

7th Pay Commission: या सणासुदीच्या काळात केंद्र सरकार कर्मचाऱ्यांच्या DA आणि DR च्या दरात पुन्हा ३ टक्क्यांनी वाढ करण्याची शक्यता आहे.

    नवी दिल्ली : केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना (Central Government Employees) येत्या काळात एकापाठोपाठ अनेक फायदे मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यामध्ये सणासुदीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (Dearness Allowances) पुन्हा एकदा ३ टक्क्यांनी वाढ होणार आहे.

    म्हणजेच, १ जुलै २०२१ पासून महागाई भत्ता १७ टक्क्यांवरून २८ टक्क्यांपर्यंत केल्यानंतर आता काही महिन्यांनी पुन्हा वाढ (DA Hike) दिली जाणार आहे. जुलै २०२१ मध्ये केंद्र सरकारने सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी (Pensioners) महागाई भत्ता ११ टक्क्यांनी वाढवून २८ टक्के करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली होती.

    गेल्या काही दिवसांपूर्वी केली होती केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी घोषणा

    या सणासुदीच्या काळात केंद्र सरकार कर्मचाऱ्यांच्या डीए आणि डीआरच्या दरात पुन्हा ३ टक्क्यांनी वाढ करण्याची शक्यता आहे. त्यामुळे केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांचा डीए आणि डीआर बेसिक वेतनाच्या २८ टक्क्यांवरून ३१ टक्के होईल. डीए आणि डीआरमध्ये वाढ करण्याव्यतिरिक्त केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना इतर काही फायदे देखील मिळतील, ज्याची घोषणा नुकतीच करण्यात आली होती.

    सणासुदीच्या काळात केंद्रीय कर्मचाऱ्यांना कोणते ५ मोठे फायदे मिळू शकतात. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या कौटुंबिक पेन्शनची मर्यादा ४५००० रुपयांवरून १.२५ लाख रुपये करण्यात आली आहे. मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत करण्यासाठी आणि त्यांना पुरेशी आर्थिक मदत देण्यासाठी केंद्राने हे पाऊल उचलले होते.