Emotional : १४ व्या वर्षी विकतोय कचोरी, व्हिडिओ व्हायरल होताच लोकांनी मदतीसाठी केली गर्दी

हा मुलगा आपल्या परिवाराचा चरितार्थ चालविण्यासाठी कचोरी विकतो आहे. हा भावनिक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल (Viral) होतो आहे. व्हिडिओत १४ वर्षांचा एक मुलगा रेल्वे स्टेशनजवळ आपल्या परिवाराचा चरितार्थ चालविण्यासाठी कचोरी विकतो आहे.

    सोशल मीडियावर (Social Media) १४ वर्षांच्या मुलाचा एक भावनिक करणारा व्हिडिओ व्हायरल (emotional video of 14 year old boy goes viral) होतो आहे. ज्यात हा १४ वर्षांचा मुलगा रस्त्याच्या कडेला कचोरी विकत आहे (selling kachori on the side of the road). हा व्हिडिओ तुमच्या हृदयाला नक्कीच स्पर्श करेल. या वयात जिथे मुले त्यांच्या मित्रांसोबत शाळेत जातात. मित्रांसोबत खेळताना दिसतात. पण हा हा पठ्ठ्या लहानपणापासून घरातील जबाबदाऱ्या सांभाळताना दिसत आहे.

    हा मुलगा आपल्या परिवाराचा चरितार्थ चालविण्यासाठी कचोरी विकतो आहे. हा भावनिक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल (Viral) होतो आहे. व्हिडिओत १४ वर्षांचा एक मुलगा रेल्वे स्टेशनजवळ आपल्या परिवाराचा चरितार्थ चालविण्यासाठी कचोरी विकतो आहे. हा व्हिडिओ लोकांच्या काळजाला थेट भिडत आहे.

    मुलगा त्याच्या गाडीवर कचोरी तयार करतो आहे. जवळपासचे लोकं या मुलाकडून कचोरी विकत घेऊन खात आहे. मुलाचा निरागसपणा पाहून तुम्ही भावुक व्हाल.

    हा व्हिडिओ ट्विटरवर @vishal_dop नावाच्या हँडलवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओवर युजर्सनी कमेंटचा पाऊस पाडला आहे.