ड्रायव्हिंग लायसन्स Rules Changes; आता मोबाइलमध्ये असतील ही कागदपत्रे तर पोलिसही तुमचं काहीही वाकडं करू शकणार नाहीत; वाचा सविस्तर

सरकारच्या निर्णयानंतर आता दिल्ली-एनसीआर (Delhi-NCR) सह संपूर्ण देशात ड्रायव्हिंग लायसन्स (DL) आणि रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट (RC) आणि पीयुसी सर्टिफिकेट, गाडी चालवताना सोबत ठेवण्याची आवश्यकता नाही. आता वाहन चालक ट्रॅफिक पोलीस आणि परिवहन विभागाला डिजी-लॉकर (DigiLocker) किंवा एम-परिवहन (m-Parivahan App) मोबाइल अ‍ॅपमध्ये डिजिटली ठेवलेले डॉक्युमेंट (Driving License) दाखवू शकतो.

    नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारने (Central Government) देशभरातील कोट्यवधी वाहन चालकांना दिलासा (Driving License) देत आणखी एक महत्वाचे पाऊल उचलले आहे. सरकारने वाहन कायद्याच्या (Vehicle Act) नियम क्रमांक १३९ मध्ये सुधारणा केली आहे, ज्यामध्ये आता वाहन चालकांना गाडीचे कागदपत्र सोबत ठेवण्याची आवश्यकता नाही (No Need To Keep Vehicle Documents With You). हे कागदपत्र डिजिटल फॉरमॅटमध्ये (Digital Format) मोबाइलमध्ये सेव्ह करून (Save In Mobile), आवश्यकता असेल तेव्हा पोलिसांना दाखवू शकता. याबाबत सरकारने नोटिफिकेशन सुद्धा जारी केले आहे.

    डिजिटली ठेवू शकता कागदपत्रे

    सरकारच्या निर्णयानंतर आता दिल्ली-एनसीआर (Delhi-NCR) सह संपूर्ण देशात ड्रायव्हिंग लायसन्स (DL) आणि रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट (RC) आणि पीयुसी सर्टिफिकेट, गाडी चालवताना सोबत ठेवण्याची आवश्यकता नाही. आता वाहन चालक ट्रॅफिक पोलीस आणि परिवहन विभागाला डिजी-लॉकर (DigiLocker) किंवा एम-परिवहन (m-Parivahan App) मोबाइल अ‍ॅपमध्ये डिजिटली ठेवलेले डॉक्युमेंट (Driving License) दाखवू शकतो.

    मिळाली कायदेशीर मंजुरी

    केंद्रीय परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या आदेशानंतर आता सर्व राज्यांमध्ये m-Parivahan अ‍ॅप आणि DigiLocker मध्ये सेव्ह केलेली कागदपत्र व्हॅलिड मानली जातील. यास आता कायदेशीर मंजुरी मिळाली आहे.

    पोलीस जबरदस्ती करू शकत नाहीत

    सरकार याबाबत सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये न्यूजपेपरमध्ये जाहिरात देऊन लोकांना माहिती देत आहे. त्यामुळे कागदपत्र दाखवण्यासाठी वाहतूक पोलीस वाहन चालकाला जबरदस्ती करू शकत नाहीत कारण आता डिजिटल फॉरमॅटमधील कागदपत्रे कायदेशीर झाली आहेत.