ग्रंथदिंडीत महाराष्ट्राच्या संस्कृती आणि परंपरेचे दर्शन

ग्रंथदिंडीत जोश, जल्लोष आणि उत्साहाचे वातावरण दिसून आले. तत्पूर्वी ग्रंथ दिंडीला सुरुवात करण्यापूर्वी पालकमंत्री आणि स्वागत स्वागत अध्यक्ष छगन भुजबळ यांनी तात्यासाहेब तथा कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला अभिवादन करून ग्रंथदिंडीला सुरुवात केली.

    कुसुमग्रजनगरी, नाशिक : ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला (94th Marathi Sahitya Sammelan, Nashik) आजपासून सुरुवात होत आहे. तत्पूर्वी सकाळी कुसुमाग्रज निवासस्थानापासून ग्रंथ दिंडीला सुरुवात करण्यात आली. या ग्रंथदिंडीत महाराष्ट्राच्या कला, संस्कृती आणि परंपरेचा दर्शन झाले.

    या ग्रंथदिंडीत (Granthdindi) मुला-मुलींनी मल्लखांबाच्या चित्तथरारक कसरती करून उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. तर इतिहासकालीन दांडपट्टा, तलवारबाजी इत्यादी ऐतिहासिक खेळाचे दर्शन सुद्धा यावेळी झाले.

    पुढे ‘राम कृष्ण हरी’, ‘ग्यानबा तुकाराम,’ तुकारामाचा जय घोष व हरी गजर करण्यात आला. ग्रंथ दिंडीच्या सुरुवातीपासूनच महाराष्ट्राच्या प्रसिद्ध झिम्मा फुगडीने सर्वानाच मंत्रमुग्ध केले. तसेच मुलामुलींनी लेझीम खेळत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

    ग्रंथदिंडीत जोश, जल्लोष आणि उत्साहाचे वातावरण दिसून आले. तत्पूर्वी ग्रंथ दिंडीला सुरुवात करण्यापूर्वी पालकमंत्री आणि स्वागत स्वागत अध्यक्ष छगन भुजबळ यांनी तात्यासाहेब तथा कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला अभिवादन करून ग्रंथदिंडीला सुरुवात केली. भुजबळ स्वतः ग्रंथ दिंडीत सामील होऊन त्यानी विणा खांद्यावर घेतली होता, ग्रंथ दिंडी संमेलन स्थळी साडे अकराच्या दरम्यान पोहोचली. संमेलनस्थळी सुद्धा सर्वत्र उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे.