Uff! मराठीतही बोल्डनेसची हद्दपार; प्राजक्ता माळी –तेजस्विनी पंडीतच्या सीन्सवर भडकले चाहते

मराठीत पहिल्यांदाच आशी बोल्ड सिरीज भेटीला येत आहे. हा बोल्ड अंदाज नेटकऱ्यांना मात्र रूचलेला नाही. अनेकांनी त्यांना यावरून ट्रोल  केलं आहे. शिवाय काहीनीं तिचं कौतुक देखील केलं आहे. प्राजक्ताने टीझरवरचं कमेंट्स सेक्शनही बंद ठेवलं आहे.

    मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री तेजस्विनी पंडित आणि प्राजक्ता माळी सध्या त्यांच्या बोल्ड अवताराने सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसत आहेत. दोघींचीही लवकरच एक बोल्ड सिरीज प्लॅनेट मराठीवर येत आहे. ‘रानबाजार’ असं या सीरिजचं नाव आहे. तेजस्विनी पंडीत आणि अभिनेत्री प्राजक्ता माळीने या सीरिजचा टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे. तेजस्विनीचा आणि प्राजक्ताचा देखील यामध्ये बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहे. हा टीझर  सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. मराठीत पहिल्यांदाच आशी बोल्ड सिरीज भेटीला येत आहे. हा बोल्ड अंदाज नेटकऱ्यांना मात्र रूचलेला नाही. अनेकांनी त्यांना यावरून ट्रोल  केलं आहे. शिवाय काहीनीं तिचं कौतुक देखील केलं आहे. प्राजक्ताने टीझरवरचं कमेंट्स सेक्शनही बंद ठेवलं आहे.

    नुकताच रानबाजार सीरिजचा टीझर सोशल मीडियावर शेअर करण्यात आला. प्राजक्ताने हा व्हिडीओ टीझर शेअर करत म्हटलं होतं की, ‘प्रत्येक कलाकाराला आपल्या कारकिर्दीत विविधांगी भूमिकांमध्ये झळकण्याची, समाजात अस्तित्वात असणारी विविध पात्रं साकारण्याची, सतत काहितरी नवं करण्याची इच्छा असते. मी त्याला अपवाद नाही. लहानपणापासून स्मिता पाटील, रंजना यांना बघत मोठी झाले, (मी त्यांच्याइतकी मोठी नक्कीच नाही.) पण त्यांच्या कारकिर्दीतून प्रेरीत होऊन आणि तुम्हां मायबाप रसिक प्रेक्षकांवर विश्वास ठेवून केलेला हा प्रयत्न.,’. पण प्राजक्ताने हा टीझर शेअर करताच लोकांनी तिला ट्रोल करणं सुरू केलं. अखेर प्राजक्ताने टीझरवरचं कमेंट्स सेक्शनचं बंद केलं.

     

     

    View this post on Instagram

     

    A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

     

    View this post on Instagram

     

    A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

    एका नेटकऱ्याने म्हटलं आहे की, मॅडम आम्ही तुम्हाला महाराष्ट्राची हास्यजत्रा यातून बघतो. पूर्ण महाराष्ट्र तुम्हाला मराठी वेशभूषेत बघतो. आम्हाला या स्वरूपाचे पात्र तुमच्याकडून अपेक्षित न्हवत. तर दुसऱ्यानं म्हटलं आहे की, ही अपेक्षा नव्हती प्राजक्ताकडून.. आणखी एकानं म्हटलं आहे की, शेवटी तूपण तोच मार्ग स्वीकारला ??..

    दुसऱ्या एकानं म्हटलं आहे की, लज्जास्पद, घृणा, लाज वाटली पाहिजे असे कृत्य समाजासमोर चित्रित करताना प्राजक्ता….अशा कमेंट करत नेटकऱ्यांनी प्राजक्ताच्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान ही सीरिज एक पॉलिटीकल थ्रीलर ड्रामा असणार आहे.