Gyanvapi's four basements were unlocked and inspected 50% survey completed in Kadekot settlement

काशी विश्वनाथ कॉरिडॉरमध्ये ज्या ठिकाणी नंदी बसला आहे, ती जागा पाडून तिथे सर्वेक्षण करण्यात यावं, अशी मागणी करण्यात आली आहे.

    ज्ञानवापी मशीदी नंतर आता काशी विश्वनाथ मंदिरातील नंदीसमोरील भिंत तोडली जाणार की, नाही यावर वाराणसी न्यायालय सुनावणी करणार आहे.

    वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीवरून वाद सुरूच आहे. दोन्ही पक्षांचे स्वतंत्र दावे आणि सर्वेक्षणानंतर आता न्यायालयात आणखी एक महत्त्वाची सुनावणी होणार आहे. आता काशी विश्वनाथ मंदिरातील नंदीसमोरील भिंत तोडली जाणार की, नाही यावर वाराणसी न्यायालय सुनावणी करणार आहे.

    ज्ञानवापी मशीद संकुलातील तलावात शिवलिंग सापडल्याच्या दाव्यानंतर काशी विश्वनाथ कॉरिडॉरमध्ये विराजमान झालेला नंदी चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. ज्याचे तोंड मशिदीच्या तलावाकडे आहे. वाराणसीच्या 3 महिलांनी न्यायालयात अर्ज दाखल करून सर्वेक्षण पुढे नेण्याची मागणी केली. त्याचबरोबर काशी विश्वनाथ कॉरिडॉरमध्ये ज्या ठिकाणी नंदी बसला आहे, ती जागा पाडून तिथे सर्वेक्षण करण्यात यावं, अशी मागणी करण्यात आली आहे.