तुमच्या भाषेत Telegram च्या माध्यमातून संदेश पाठविण्याचा सोपा मार्ग

Telegram Features : टेलीग्रामवर यूजर्सना WhatsApp पेक्षा जास्त फीचर्स मिळतात आणि असे काही फीचर्स आहेत जे व्हॉट्सॲपवर अजून आलेले नाहीत. आज आम्‍ही तुम्‍हाला टेलिग्राममध्‍ये असलेल्‍या ट्रान्सलेशन फीचरचा कसा वापर करू शकता हे सांगणार आहोत.

    स्टेप १
    सर्वप्रथम तुमच्या Android किंवा Apple iPhone वर Telegram App उघडा. नंतर वर दिसलेल्या तीन-लाइन आयकॉनवर टॅप करा.

     

    स्टेप २
    तीन-लाइन आयकॉनवर क्लिक केल्यानंतर, तुम्हाला सेटिंग्ज मेनूवर टॅप करावे लागेल.

     

    स्टेप ३
    सेटिंग्जमध्ये गेल्यानंतर, तुम्हाला येथे Language ऑप्शन दिसेल, ज्यामध्ये तुम्हाला Telegram App द्वारे समर्थित भाषांची संपूर्ण यादी मिळेल.

     

    स्टेप ४
    लँग्वेज ऑप्शनच्या टॉपला एक भाषांतर बटण दिसेल, ते एनेबल म्हणजेच ऑन करा.

     

    स्टेप ५
    हे Telegram Feature अॅक्टिव्ह होताच, तुम्ही कोणत्याही वैयक्तिक चॅट किंवा ग्रुप चॅटमध्ये भाषांतर पर्याय वापरण्यास सक्षम असाल. तुम्हाला फक्त भाषांतर पर्यायावर टॅप करायचं आहे आणि तुमचा मेसेज त्या भाषेत बदलला जाईल.