अफगाणिस्तानच्या काबुलमध्ये भयंकर स्फोट, माजी तालिबान नेत्याच्या पुण्यतिथी कार्यक्रमावेळी झाला हल्ला

अफगाणिस्तान पुन्हा एकदा स्फोटाने हादरली आहे. देशाची राजधानी काबूलमध्ये रविवारी मोठा बॉम्बस्फोट झाला. माजी तालिबान नेता मुल्ला अख्तर मोहम्मद मन्सूर यांच्या पुण्यतिथीनिमित्त शोक व्यक्त करण्यासाठी आलेल्या लोकांना येथे लक्ष्य करण्यात आले आहे.

    काबूल : अफगाणिस्तान पुन्हा एकदा स्फोटाने हादरली आहे. देशाची राजधानी काबूलमध्ये रविवारी मोठा बॉम्बस्फोट झाला. माजी तालिबान नेता मुल्ला अख्तर मोहम्मद मन्सूर यांच्या पुण्यतिथीनिमित्त शोक व्यक्त करण्यासाठी आलेल्या लोकांना येथे लक्ष्य करण्यात आले आहे.

    इस्तिकलाल हॉलच्या गेटवर हा स्फोट झाला. देशाच्या टोलो न्यूजने एका प्रत्यक्षदर्शीच्या हवाल्याने या घटनेचे वृत्त दिले आहे. अफगाणिस्तानात बॉम्बस्फोट होणे नित्याचे झाले आहे. यातील बहुतांश स्फोटांचा संबंध इसिसशी आहे. मात्र, यावेळी स्फोटाची जबाबदारी कोणीही स्वीकारलेली नाही.या स्फोटात अनेक जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.