राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर अजित पवारांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…

राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये शिंदे गटाच्या ९ आणि भाजपच्या ९ जणांना स्थान देण्यात आले आहे. या मंत्रिमंडळ विस्ताराच्या कार्यक्रमासाठी राज्याचे विरोधी पक्षनेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित होते. शपथविधी कार्यक्रमानंतर अजित पवार (Ajit Pawar Reaction On Cabinet Expansion) यांनी या मंत्रीमंडळ विस्तारावर प्रतिक्रिया व्यक्त केली.

    मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा आज विस्तार झाला. राजभवनामध्ये १८ मंत्र्यांचा शपथविधी (Maharashtra Cabinet Expansion) पार पडला. राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये शिंदे गटाच्या ९ आणि भाजपच्या ९ जणांना स्थान देण्यात आले आहे. या मंत्रिमंडळ विस्ताराच्या कार्यक्रमासाठी राज्याचे विरोधी पक्षनेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित होते. शपथविधी कार्यक्रमानंतर अजित पवार (Ajit Pawar Reaction On Cabinet Expansion) यांनी या मंत्रीमंडळ विस्तारावर प्रतिक्रिया व्यक्त केली.

    “ज्या नेत्यांवर आरोप झाले आणि ज्यांना अद्याप क्लीन चिट मिळाली नाही त्यांना टाळलं असतं तर बरं झालं असतं,” असं मत पवारांनी व्यक्त केलं.

    अजित पवार म्हणाले, “उशिराने का होईना एकदाचा शपथविधी झाला. आता महाराष्ट्राला मंत्रिमंडळ मिळालं आहे. आता लवकरात लवकर महाराष्ट्रातील प्रश्न सोडवावेत. राज्यात पावसासह शेतकरी आणि इतर खूप समस्या आहेत ते सोडवाव्यात.
    महाराष्ट्राला मंत्रिमंडळ मिळालं, मात्र एक झालं ज्यांच्यावर आरोप आहेत आणि त्यांना त्यातून क्लीन चिट मिळालेली नाही अशांनाही मंत्रिमंडळात घेतलं गेलं. ते टाळलं असतं तर बरं झालं असतं.”