सण उत्सवांचा काळ पाहता राज्यात हाय अलर्ट जारी – देवेंद्र फडणवीस

रायगड जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यावर बेवारस बोट (Suspicious Boats In Raigad) आढळून आली. यात एके ४७ तसेच कागदपत्र आढळून आली. त्यामुळे सदर बोटींबाबत संशय वाढला. याची माहिती अनिकेत तटकरे यांनी सभागृहत देत, या संशयित बोटीची त्वरित माहिती घ्यावी अशी मागणी केली. दरम्यान या बोटीची माहिती घेण्यात आली असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सांगितले.

    मुंबई : रायगड जिल्ह्यातील (Raigad) श्रीवर्धन समुद्र किनारी भरकटलेली बोट (Suspicious Boats In Raigad) धडकल्याने खळबळ उडाली आहे. या बोटीची माहिती घेत या बोटीबाबत विधान परिषदेत अनिकेत तटकरे यांनी प्रश्न उपस्थित केला. या बोटीची त्वरित चौकशी करावी, अशी मागणी तटकरे यांनी सभागृहात केली. दरम्यान फार थोड्या काळात बोटीची माहिती कोस्ट गार्डकडून आल्याची माहिती उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. दरम्यान सध्या सुरु असलेल्या सण उत्सवांचा काळ पाहत राज्यात हाय अलर्ट घोषित करण्यात आला असल्याचे फडणवीस म्हणाले.

    दरम्यान रायगड जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यावर बेवारस बोट आढळून आली. यात एके ४७ तसेच कागदपत्र आढळून आली. त्यामुळे सदर बोटींबाबत संशय वाढला. याची माहिती अनिकेत तटकरे यांनी सभागृहत देत, या संशयित बोटीची त्वरित माहिती घ्यावी अशी मागणी केली. दरम्यान या बोटीची माहिती घेण्यात आली असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सांगितले.

    सभागृहाला माहिती देताना फडणवीस म्हणाले की, श्रीवर्धमधील हरिहरेश्वर समुद्र किनारपट्टीवर एक दुर्घटनाग्रस्त बोट आढळली आहे. या बोटीची माहिती मिळाली असली तरी देखील राज्यात हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे नाकाबंदीचे आदेश देत हाय अलर्ट घोषित करण्यात आल असल्याचे फडणवीस म्हणाले. या बेवारस बोटीचे नाव लेडी हाय असे असून या बोटीची मालकीण ऑस्ट्रेलियामधली आहे. ही बोट मस्कतहुन दुबईला जात असताना ती समुद्रात भरकटली असल्याची माहिती कोस्ट गार्ड कडून देण्यात आली. दरम्यान बोटीबाबत माहिती मिळाली असली तरी देखील सध्या राज्यात सण उत्सव सुरु असल्याने हाय अलर्ट घोषित करण्यात आला असल्याचे फडणवीस यांनी माहिती दिली.