महाराष्ट्र बॅडमिंटन संघटनेच्या अध्यक्षपदी पुन्हा अरुण लखानींची वर्णी

    नागपूर : महाराष्ट्र बॅडमिंटन संघटनेची ( Maharashtra Badminton Association) बहुप्रतिक्षित निवडणूक (Elections)  रविवारी २५ सप्टेंबर रोजी नागपूर (Nagpur) येथेच पार पडली. नागपूरमध्ये झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ही निवडणूक आयोजित केली गेली असून यावेळी विद्यमान अध्यक्ष अरुण लखानी (Arun Lakhani) यांच्या पॅनेलने उपाध्यक्ष प्रदीप गंधे यांच्या पॅनेलचा निवडणुकीत हरवले. केवळ एक सचिव पदाचा उमेदवार सोडून विद्यमान अध्यक्ष अरुण लखानी यांच्या पॅनेलचे सर्व उमेदवार निवडून आले. सचिव पदासाठी आशीष वाजपेयींनी मयूर घाटणेकरांना हरवले.

    महाराष्ट्र बॅडमिंटन संघटनेची नवीन कार्यकारिणी :

    अध्यक्ष– अरुण लखानी
    उपाध्यक्ष– अक्षय देवळकर
    वरिष्ठ उपाध्यक्ष– शिरीष बोरळकर
    उपाध्यक्ष (एकूण ६ पदे)- प्रदीप गबाडा, धनंजय गाडगीळ, ओंकार हजारे, मंगेश काशीकर, शाह मोहन एम, पंकज ठाकूर
    सचिव– श्रीकांत वाड
    सहसचिव– सिद्धार्थ पाटील
    सचिव (प्रशिक्षण) – जोवेल चांदेकर
    सचिव (स्पर्धा)– आशीष वाजपेयी
    कोशाध्यक्ष- जगदीश जोशी