bhaskar jadhav jakhadi dance

तुरंबव गावची ग्रामदेवता शारदादेवीच्या दरबारात भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) थिरकताना दिसले. विशिष्ट पेहराव घालून दरवर्षी न चुकता भास्कर जाधव पारंपरिक जाखडी नृत्यात (Jakhadi Dance) सहभागी होत असतात.

    रत्नागिरी : सध्या सगळीकडे नवरात्रोत्सवाचा (Navaratri 2022) उत्साह दिसून येत आहे. कोरोनामुळे दोन वर्ष लोकांना नवरात्रीचा उत्सव साजरा करता आला नव्हता. त्यामुळे यावर्षी लोकांनी नवरात्रीच्या उत्सवात आवर्जून सहभाग घेतल्याचं दिसून येत आहे. रत्नागिरीतील (Ratnagiri) चिपळूणमध्ये शिवसेना नेते भास्कर जाधवांनी (Bhaskar Jadhav) नवरात्रीच्या उत्सवाचा आनंद घेतला. भास्कर जाधवांनी देवीच्या दरबारात चक्क जाखडी नृत्यावर (Bhaskar Jadhav Jakhadi Dance) ठेका धरला.

    यावेळी भास्कर जाधव जाखडीसाठीच्या पारंपारिक वेशभूषेत आले होते. तुरंबव गावची ग्रामदेवता शारदादेवीच्या दरबारात भास्कर जाधव थिरकताना दिसले. विशिष्ट पेहराव घालून दरवर्षी न चुकता भास्कर जाधव पारंपरिक जाखडी नृत्यात सहभागी होत असतात. यंदाच्या वर्षीही भास्कर जाधवांचा जाखडी नृत्य करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. आपल्या व्यस्त दिनक्रमातूनही ते देवीच्या नवरात्रोत्सवासाठी वेळ काढतात आणि जाखडी नृत्यही करतात त्याबद्दल त्यांचं कौतुक होत आहे.