unemployment in india

बँकिंग संकट जर अधिक तीव्र झालं तर त्याचा सर्वाधिक फटका हा टीसीएस, इन्फोसिस, विप्रो आणि एलआयटी माइंडट्री या कंपन्यांना बसण्याची शक्यता आहे. या कंपन्यांचा अमेरिकेतील आर्थिक संस्थांसोबत मोठा व्यापार असल्यानं ही शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मुंबई:अमेरिका आणि युरोपमध्ये आलेलं बँकिंग संकट दिवसेंदिवस अधिकाधिक वाढत असल्याचं दिसतंय. अमेरिकेतील दोन बँका दिवाळखोरीत (Banking Crisis) निघाल्या आहेत, तर इतर बँका सध्या अस्तित्व वाचवण्याच्या प्रयत्नात असल्याचं दिसतंय. दुसरीकडे युरोपीतील सर्वात मोठ्या बँकांत समावेश असलेली क्रेडिट सुईसची (Credit Suisse) परिस्थिती ही खराब आहे. आता या सगळ्याच्या झळा भारतालाही बसू लागल्या आहेत. या सगळ्याचा परिणाम देशावरही होणार असून, भारतातील सुमारे 245 अब्ज डॉलर्स उलाढाल असलेलं आयटी बिझनेस प्रोसेस मॅनेजमेंट क्षेत्राचं भविष्य अधांतरी असल्याचं मानण्यात येतंय. या क्षेत्राचं 41 टक्के उत्पन्न बँकिंग, आर्थिक सेवा आणि विमा या क्षेत्रातून येते. जगातील मोठ्या बँका दिवाळखोरीत निघत असल्यानं आर्थिक क्षेत्राचं उत्पन्न (Economic Crisis) मोठ्या प्रमाणावर घटण्याची शक्यता आहे. या बँका यातून सावरण्यासाठी टेक बजेटमध्ये कपात करण्याची किंवा झालेले करार रद्द करण्याचीही भीती आता वर्तवण्यात येत आहे.

देशातील मोठ्या कंपन्यांना बसणार फटका
बँकिंग संकट जर अधिक तीव्र झालं तर त्याचा सर्वाधिक फटका हा टीसीएस, इन्फोसिस, विप्रो आणि एलआयटी माइंडट्री या कंपन्यांना बसण्याची शक्यता आहे. या कंपन्यांचा अमेरिकेतील आर्थिक संस्थांसोबत मोठा व्यापार असल्यानं ही शक्यता वर्तवण्यात येत आहे. अमेरिकेतील स्थानिक बँकांची परिस्थिती सध्या सर्वाधिक वाईट असल्याचं तज्ज्ञ सांगतायेत. त्यामुळे त्यांना सेवा देणाऱ्या कंपन्यांत सध्या खळबळ उडालेली आहे. यात टीसीएस आणि इन्फोसिसचाही समावेश आहे. या कंपन्यांनी याबाबत अद्याप अधिकृत भूमिका जाहीर केली नसली तरी आयटी क्षेत्रातील अनेक कंपन्यांत सध्या वादळ आलेलं आहे. असं सांगण्यात येतंय.

बँकिंग फायनान्स सर्व्हिस इंडस्ट्री भारतासाठी का महत्त्वाची
जगभरातील रिटेल बँकिंग क्षेत्रात टेक्नॉलॉजीत गुंतवणूक करण्यात उत्तर अमेरिकेतील बँका अग्रेसर राहिलेल्या आहेत. 2022 साली या बँकांचं आयटी बजेट हे 82 अब्ज डॉलर्स इतके मोठे होते, त्यावेळी जगाचं हजेट हे 250 अब्ज डॉलर्स इतकं होतं. बँका या टेक बजेटवर खर्च करत असल्याचा मोठा फायदा भारतातील कंपन्यांना होत होता. टीसीएस, इन्फओसिस, विप्रो आणि माइंडट्री या कंपन्यांना उत्तर अमेरिकेतील बँकांमध्ये व्यवसायाची मोठी संधी आहे. बँकिंग क्षेत्र अडचणीत आल्यानं त्यांच्या बीएफएसआय वाढीवर मर्यादा येणार आहेत.

2023 मध्ये या क्षेत्राचा 41 टक्के महसूल हा बीएफएसआय इंडस्ट्रीतून आलेला आहे. यातील उत्तर अमेरिकेचेा वाटा सर्वाधिक 50 टक्के आहे. आता बँकिंग संकटाची सुरुवात ही अमेरिकेतून झाली असल्यानं त्याचा फटका भारतीय कंपन्यांना बसण्याची शक्यता आहे.

लाखो नोकऱ्या संकटात
या सगळ्याचा मोठा फटका सहन करावा लागणार असून, नव्या प्रकल्पांवर याचा जास्त परिणाम होणार असल्याचं तज्ज्ञ सांगतायेत. अनिश्चिततेच्या वातावरणात कॉस्ट प्रेशर वाढण्याची शक्यता आहे. यामुळे आउटसोर्सिंग वाढेल आणि सध्या सुरु असलेल्या प्रकल्पांचा पुन्हा फेरआढावा घेतला जाण्याचीही शक्यता आहे. अशा स्थितीत आयटी कंपन्या या आर्टिफिशियल इंडेलिजन्सचा वापर वाढवतील, यामुळं त्यांच्या नफ्यावर फारसा परिणाम होणार नाही. याचा फटका लाखो नोकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे. मार्चमध्ये जेव्हा या कंपन्या तिमाही नफ्याची घोषणा करतील तेव्हा त्यांना गुंतवणूकदारांच्या अनेक प्रश्नांना तोंड द्यावे लागणार आहे.