pathaan

‘पठाण’ या सिनेमाचं दिग्दर्शन सिद्धार्थ आनंदने केलं आहे. यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. आजही या सिनेमाची चांगलीच क्रेझ आहे. ‘पठाण’ सिनेमा सिनेमागृहात रिलीज होण्यापूर्वी सेन्सॉर बोर्डाने यातील काही सीन्स हटवले होते. ओटीटी व्हर्जनमध्ये प्रेक्षकांना हे सीन्स पाहायला मिळणार आहेत.

शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) ‘पठाण’ (Pathaan) या सिनेमाने सिनेमागृहात सात आठवडे धुमाकूळ घातल्यानंतर हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. येत्या 22 मार्चपासून हा सिनेमा प्रेक्षकांना घरी बसून पाहता येणार आहे.

शाहरुख खानचा ‘पठाण’ (Pathaan) हा सुपरहिट सिनेमा 25 जानेवारी 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. आता सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर आता हा सिनेमा अमेझॉन प्राइम व्हिडीओ या (Prime Video) ओटीटी प्लॅटफॉर्मवर 22 मार्चला प्रदर्शित होणार आहे.  हिंदी, तामिळ आणि तेलुगू भाषेत सिनेमा पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by prime video IN (@primevideoin)


सेन्सॉर बोर्डाने हटवलेले सीन्स पाहता येणार
‘पठाण’ या सिनेमाचं दिग्दर्शन सिद्धार्थ आनंदने केलं आहे. यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. आजही या सिनेमाची चांगलीच क्रेझ आहे. ‘पठाण’ सिनेमा सिनेमागृहात रिलीज होण्यापूर्वी सेन्सॉर बोर्डाने यातील काही सीन्स हटवले होते. ओटीटी व्हर्जनमध्ये प्रेक्षकांना हे सीन्स पाहायला मिळणार आहेत.

‘पठाण’ या सिनेमात शाहरुख खानसोबत दीपिका पादुकोण (Deepika Padukone), जॉन अब्राहम (John Abraham), डिंपल कपाडिया आणि आशुतोष राणा महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. तसेच बॉलिवूडचा भाईजान सलमान खानची (Salman Khan) झलकदेखील या सिनेमात आहे.

ॲक्शन हिरो
‘पठाण’ चित्रपटाद्वारे शाहरुख खानची ॲक्शन हिरो बनण्याची इच्छा पूर्ण झाली आहे. शाहरुखने आधी एका मुलाखतीत सांगितलं होतं की मी इंडस्ट्रीत ॲक्शन हिरो बनण्यासाठी आलो होतो. मात्र लोकांनी मला रोमँटिक हिरो बनवून टाकलं. ‘पठाण’ हा माझा पहिला ॲक्शन सिनेमा आहे. याविषयी जॉन म्हणाला की, शाहरुखने ‘पठाण’ सिनेमात खूप छान ॲक्शन सीन दिले आहेत. तो एक उत्कृष्ट ॲक्शन हिरो आहे असं वाटतं. मला आश्चर्य वाटतं की तो आधी ॲक्शन हिरो म्हणून कोणत्या चित्रपटात का आला नाही.

शाहरुखच्या‘पठाण’ सिनेमाने आतापर्यंत भारतात 522 कोटींची कमाई केली आहे. दुसरीकडे जगभरात या सिनेमाने 1055 कोटींचा गल्ला जमवला आहे. ‘पठाण’ या सिनेमाच्या यशानंतर सिद्धार्थ आनंदने या सिनेमाच्या दुसऱ्या भागाची म्हणजेच ‘पठाण 2’ची घोषणा केली आहे. पठाणचा दुसरा भाग 2024 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकतो.